Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

| Updated on: Jan 17, 2021 | 11:32 AM

दीया मिर्झाची माजी मॅनेजर आणि व्यावसायिक करण सजनानी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Karan Sajnani along with Diya Mirza's former manager jailed for 14 days)

Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow us on

मुंबई : दीया मिर्झाची माजी मॅनेजर आणि व्यावसायिक करण सजनानी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या एस्प्लेनेट कोर्टानं हा निर्णय दिलाय. दोघांनाही एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून एनसीबीला 200 किलो गांजा मिळाला होता.

30 जानेवारीपर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच एनसीबीच्या मुंबई युनिटनं मुंबईच्या तीन भागात छापा मारला आणि दोन महिला आणि एका ब्रिटीश नागरिकाला अटक केली होती. या छाप्यात सुमारे 200 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये बॉलिवूडची माजी मॅनेजर राहीला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि करण सजनानी या ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे.

चौकशी एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं होतं की, तपासणी दरम्यान सजनानीनं सांगितलं होतं की तो कोणाला ड्रग्ज पुरवत होता. चौकशीदरम्यान त्यानं मुच्छद पानवाले याचंही नाव घेतलं होतं. यानंतर एनसीबीच्या पथकानं कॅम्स कॉर्नरमधील त्याच्या दुकानात छापा टाकला, तेथून त्याला काही अमली पदार्थांची सामग्री मिळाली.

यापूर्वी एनसीबीनं अर्जुन रामपालच्या बहिणीला चौकशीसाठी समन्स पाठवला होता. अर्जुन रामपालला ड्रग्ज प्रकरणात चौकशीनंतर त्याच्या बहिणीला बोलवण्यात आलं. अर्जुन रामपाल बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्यांचं नाव फारच वादात आहे. मात्र ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपाल जास्त चर्चेत आला आहे.

संबंधित बातम्या 

RIP Pista : ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

‘तांडव’ला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप