RIP Pista : ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

RIP Pista : 'बिग बॉस'ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

'बिग बॉस'मध्ये टॅलेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली पिस्ता धाकड या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. (Accidental death of 'Bigg Boss' crew member Pista Dhakad)

VN

|

Jan 17, 2021 | 10:52 AM

मुंबई : ‘बिग बॉस 14’ हा शो सध्या सर्वात जास्त लोकप्रिय आहे. या शोची नेहमीच चर्चा होत असते. मात्र नुकतीच या शोमधून एक दु:खद बातमी समोर आहे. ‘बिग बॉस 14’ च्या विकेंडचा वारसाठी शोची संपूर्ण टीम फिल्मसिटीमघ्ये शूटिंग करत होती. शूटिंग संपल्यानंतर रात्री या शोची टॅलेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली पिस्ता धाकड ही तरुणी आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत घरी जाण्यास निघाली असता, काळोखात अंदाज न आल्यानं अॅक्टिवा स्कूटर एका खड्ड्यात जाऊन अडकली आणि या अपघातात पिस्ता धाकडचा जागीच मृत्यू झाला.

शोचं शूटिंग संपल्यानंतर गोरेगाव फिल्मसिटीमध्येच हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर मनोरंजन विश्वात शोक व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

डेव्हिलीना भट्टाचार्य यांनी पिस्ता धाकडला श्रद्धांजली वाहिली- “काय चाललं आहे मला काहीच कळत नाहीये. हे देवा मला दु: ख व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. पिस्तू, आपण काल रात्री बोललो… बाळा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझी खूप आठवण येईल, माझी पिस्ता कुख्यात आहे. तिच्या कुटुंबियांबद्दल आणि मित्रांबद्दल सहानुभूती आहे आणि देवा त्यांना सामर्थ्य मिळू देत. ”

बिग बॉसचा माजी स्पर्धक अ‍ॅंडीनंसुद्धा पिस्ताला श्रद्धांजली वाहिली आहे- “पिस्ता धाकड यांच्या मृत्यूची बातमी कळताच वाईट वाटलं. ती फक्त 23 वर्षांची होती. तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करुया. ”

हिमांशी खुराणा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे- “आरआयपी पिस्ता, नुकतंच पिस्ताच्या मृत्यूची बातमी मिळाली. मला धक्का बसला आहे. आयुष्याबद्दल काहीच सांगता येत नाही. ”

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें