करीनाची चोरी पडकली गेली; बारिक कंबर दाखवण्याच्या नादात केली ‘ही’ चूक

सोशल मीडियावर असंख्य सेलिब्रिटी स्वत:चे विविध फोटो पोस्ट करत असतात. या फोटोंमध्ये त्यांची परफेक्ट फिगर पाहून चाहत्यांनाही सेलिब्रिटींचा हेवा वाटतो. मात्र बारिक कंबर दाखवण्याच्या नादात अभिनेत्री करीना कपूरने मोठी चूक केली आहे. तिची ही चूक नेटकऱ्यांच्या निदर्शनास आली.

करीनाची चोरी पडकली गेली; बारिक कंबर दाखवण्याच्या नादात केली ही चूक
Kareena Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 21, 2024 | 11:09 AM

मुंबई : 21 मार्च 2024 | अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या आगामी ‘क्रू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच या चित्रपटातील एक गाणं लाँच करण्यात आलं. माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याचा हा रिमेक आहे. या चित्रपटासोबतच करीना एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने स्वत:चे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मात्र हे फोटो फोटोशॉप करून एडिट केल्याचं नेटकऱ्यांच्या निदर्शनास आलंय. त्यावरून अनेकजण करीनाला ट्रोल करत आहेत. ट्रोलिंगला सुरुवात होताच करीनाने 24 तासांसाठी दिसणाऱ्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून तो फोटो लगेच डिलिट केला. मात्र तोपर्यंत नेटकऱ्यांनी त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल केले होते.

करीनाला जेव्हा नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली तेव्हा, तिला तिची चूक समजली आणि तिने तिचे सर्व फोटो डिलिट केले. त्यातीलच एका फोटोमध्ये करीना ज्याठिकाणी उभी होती, तिथल्या खिडकीची बाजू एका बाजूने वाकलेली दिसली. त्यामुळे करीनाने नक्कीच फोटोशॉप केलेत, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. या फोटोंमध्ये करीनाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केल्याचं दिसून येत आहे. दरवाज्याला टेकून तिने फोटोसाठी पोझ दिले आहेत. मात्र फोटोशॉपमध्ये कंबर बारिक दाखवण्याच्या नादात बाजूची खिडकीसुद्धा एडिट झाल्याची चूक करीनाच्या लक्षात आली नसावी. तो फोटो तसाच पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली.

पहा फोटोशॉप केलेला फोटो

करीनाचा फोटोशॉप केलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट शेअर करत नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘किमान फोटोशॉप तरी नीट करायचा’, असं एकाने लिहिलं. तर ‘कंबर बारीक दाखवण्याच्या नादात चूक दिसून आली’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

ट्रोलिंगनंतर करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ते सर्व फोटो डिलिट केले आणि त्यानंतर पोस्टमध्ये फोटो अपलोड करताना फोटोशॉप केलेला फोटो दिसू नये याची काळजी घेतली. करीनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, 2022 मध्ये तिचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ती ‘जाने जान’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. आता तिचा ‘क्रू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये करीनासोबत तब्बू आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत.