VIDEO : काय सांगता…! चक्क करीना कपूर खान पुणे पोलिसांची झाली फॅन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

| Updated on: Jan 17, 2022 | 9:52 AM

कोरोनाने (Corona) संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस (Police) सातत्याने लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मास्क घालण्याबाबत जागरूक करताना देखील दिसत आहेत.

VIDEO : काय सांगता...! चक्क करीना कपूर खान पुणे पोलिसांची झाली फॅन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
करिना कपूर
Follow us on

मुंबई : कोरोनाने (Corona) संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस (Police) सातत्याने लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मास्क घालण्याबाबत जागरूक करताना देखील दिसत आहेत. अलीकडेच पुणे पोलिसांनी लोकांना मास्क घालण्यासाठी आणि कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे.

व्हिडीओ पाहून पुणे पोलिसांची करीना फॅन

पुणे पोलिसांच्या अनोख्या पद्धतीवर अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) खान देखील खुश झाली आहे. इतकेच नव्हेतर चक्क करीनाने पुणे पोलिसाचा मास्कच्या जनजागृतीचा एक खास व्हिडीओ शेअर करत पोलिसांचे काैतुक केले आहे. करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक पोलीस ‘ए भाई जरा देख के चलो’ हे गाणे म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी एका खास पध्दतीने गाणे म्हणताना दिसत आहे.

विशेष म्हणजे यामध्ये व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचाऱ्यारी खास शैलीमध्ये गाण्याच्या माध्यमातून लोकांना मास्क घालण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. ANA या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात 24 तासांत कोविड-19 चे 41,327 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. राज्यात कोविड-19 च्या ओमिक्रॉनच्या 8 नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या 1,738 वर पोहोचली आहे.

ए भाई जरा देख के चलो गाण्यातून जनजागृती 

1970 मध्ये राजकुमार यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आरके फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपटाची स्टोरी ख्वाजा अहमद अब्बास यांनी लिहिली होती. या चित्रपटात राज कपूर, सिमी गरेवाल, ऋषी कपूर, केसेनिया रायबिन्किना, पद्मिनी या कलाकारांचा समावेश होता. या चित्रपटात मनोज कुमार, धर्मेंद्र, दारा सिंग आणि राजेंद्र कुमार यांच्याही भूमिका होत्या.

संबंधित बातम्या : 

‘इलू इलू’ गाण्याचे गीतकार हरपले, सुनील सकट यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

Kiran Mane Post : ‘कट रचला जातोय; पण माझ्याकडेही पुरावे आहेत, वेळ आली की बाहेर काढेन’