‘इलू इलू’ गाण्याचे गीतकार हरपले, सुनील सकट यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

'इलू इलू' गाण्याचे गीतकार हरपले, सुनील सकट यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
सुनील सकट

लोकगीतकार आणि कवी सुनील सकट (Lyricist Sunil Sakat) यांचं शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

प्रदीप गरड

|

Jan 17, 2022 | 8:52 AM

मुंबई : लोकगीतकार आणि कवी सुनील सकट (Lyricist Sunil Sakat) यांचं शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. अलिकडेच त्यांनी लिहिलेलं इलू इलू (Ilu Ilu Song) हे गाणं तुफान चाललं. दोन मिलियन(Million)हून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले. यासह विविध गाणी त्यांनी लिहिली, ज्यांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. विशेषत: लोकगीतांच्या बाबतीत तर त्यांची अनेक गाणी प्रसिद्ध होती.

लहानपणापासूनच संगीताची आवड

सकट यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. सुरुवातीला त्यांनी ढोलकी वाजवण्यास सुरुवात केली. त्यासोबतच त्यांना गीतलेखनातही विशेष रुची होती. त्यांनी आला बाबूराव, शूरविरांची तलवार, एकच नंबर अशा एक ना अनेक गीतांचं लेखन केलं. अनेक सुप्रसिद्ध गायकांनी त्यांची ही गाणी गायली. यामध्ये सुरेश वाडकर, वैशाली सामंत, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे आदी गायकांचा समावेश आहे.

अकाली एक्झिट घेतल्याबद्दल व्यक्त केलं जातय दु:ख

त्यांच्या निधनाबद्दल संगीत क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे. त्यांनी लिहिलेली गीतं ही अत्यंत लोकप्रिय अशी होती. मनोरंजन क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक होत असलं तरी अशाप्रकारे एका कलाकारानं अकाली एक्झिट घेतल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं जात आहे.

कलाविश्वातून श्रद्धांजली

त्यांच्या निधनाबद्दल कलाविश्वातून दु:ख व्यक्त होत असून गीतकार साईनाथ पाटोळे यांनी त्याला का रं दडवलं गीतातून श्रद्धांजली अर्पण केलीय. या गाण्याला संदीप-योगेश यांनी संगीत दिलं असून रोमिओ कांबळे यांनी ते गायलं आहे. वाचकांसाठी हे गाणं उपलब्ध करून देत आहोत. (सौ. योगेश बाळू कांबळे – यूट्यूब)

Kiran Mane Post : ‘कट रचला जातोय; पण माझ्याकडेही पुरावे आहेत, वेळ आली की बाहेर काढेन’

‘अरे ही मुकी होती ना, बोलते कशी?’ किरण मानेंची बाजू घेत युजर्सनी तोडले क्रीएटिव्हिटीचे तारे, एकापेक्षा एक भन्नाट कमेंट

‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांमध्ये उभी फूट! एका गटासाठी किरण माने हिरो, तर दुसऱ्या गटासाठी झिरो का?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें