Kareena Kapoor | “एक बार हात लगाने दो”; करीना कपूरकडे महिलेची अजब विनंती, पहा व्हिडीओ

| Updated on: May 07, 2023 | 9:25 AM

'आजकाल लोकांचा काहीच भरोसा नाही. यात करीनाची काहीच चूक नाही', असं दुसऱ्याने म्हणत तिला पाठिंबा दिला. 'हात मिळवण्याच्या बहाण्याने त्या महिलेनं तिला इजा पोहोचवली असती तर..', अशीही भीती एका चाहत्याने व्यक्त केली.

Kareena Kapoor | एक बार हात लगाने दो; करीना कपूरकडे महिलेची अजब विनंती, पहा व्हिडीओ
Kareena Kapoor Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अशा काही घटनांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या वागणुकीची आणि स्वभावाची चर्चा होऊ लागते. कधी एखादा चाहता फोटो क्लिक करण्यासाठी त्यांच्या खूपच जवळ येतो, तर कधी चाहते त्यांचा पाठलाग करणं सोडत नाहीत. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री करीना कपूर खानला आला. मुंबईत ती नुकतीच पती सैफ अली खानसोबत डिनर डेटवर गेली होती. मात्र रेस्टॉरंटबाहेर पोहोचल्यानंतर रस्त्यावर चाहत्यांनी तिच्या आजूबाजूला गर्दी केली. त्यातील एका चाहतीने करीनाकडे चक्क तिला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर करीनाची प्रतिक्रिया काय होती, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सैफ आणि करीना त्यांच्या कारमधून बाहेर पडतात. यावेळी सैफ पुढे रेस्टॉरंटमध्ये निघून जातो. मात्र करीना जेव्हा चालू लागते, तेव्हा अचानक एक चाहती तिच्याजवळ येऊन तिला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त करते. “एकदा फक्त हात लावू दे”, असं ती वारंवार करीनाला म्हणते. तितक्यात सुरक्षारक्षक पुढे येऊन त्या महिलेला बाजूला करतो. करीना तेव्हासुद्धा स्मितहास्य करत पुढे निघून जाते. रेस्टॉरंटच्या आत जाण्याआधी करीना पुन्हा मागे वळून त्या चाहतीकडे पाहते.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘करीनाच काय एखादी सर्वसामान्य व्यक्ती असती तरी कोणी असं अनोळखी व्यक्तीशी हात मिळवता नसता’, असं एकाने लिहिलं. तर ‘आजकाल लोकांचा काहीच भरोसा नाही. यात करीनाची काहीच चूक नाही’, असं दुसऱ्याने म्हणत तिला पाठिंबा दिला. ‘हात मिळवण्याच्या बहाण्याने त्या महिलेनं तिला इजा पोहोचवली असती तर..’, अशीही भीती एका चाहत्याने व्यक्त केली.

पहा व्हिडीओ

करीनाने ‘द क्रू’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यामध्ये तिच्यासोबत क्रिती सनॉन, दिलजित दोसांझ आणि तब्बू यांच्याही भूमिका आहेत. राजेश कृष्णन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. करीनाच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळालं होतं.