‘मुलांना मॅनर्सच शिकवले नाहीत’; करीना कपूरवर का भडकले नेटकरी?

अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी करीनाला ट्रोल करत आहेत. मुलांना शिस्त शिकवली की नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. करीनाचा लहान मुलगा जेहची वागणूक पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.

मुलांना मॅनर्सच शिकवले नाहीत; करीना कपूरवर का भडकले नेटकरी?
Kareena Kapoor's son Jeh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 31, 2024 | 11:18 AM

मुंबई : 31 डिसेंबर 2024 | गेल्या काही वर्षांत ‘पापाराझी कल्चर’ खूप वाढलंय. त्यामुळे सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांचे व्हिडीओ सहज सोशल मीडियावर पहायला मिळतात. जिम, मार्केट, रेस्टॉरंट.. अशा विविध ठिकाणी पापाराझी सेलिब्रिटींचा पाठलाग करतात आणि त्यांचे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात. अनेकदा काही व्हिडीओंमुळे सेलिब्रिटींना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. असंच काहीसं सध्या अभिनेत्री करीना कपूरसोबत घडलं आहे. करीना नुकतीच तिच्या दोन्ही मुलांसोबत पाहिली गेली. मात्र यावेळी तिचा छोटा मुलगा जेहचं वागणं नेटकऱ्यांना अजिबात पटलं नाही. त्यावरून त्यांनी आई करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये करीना तिच्या दोन्ही मुलांसोबत कारमधून उतरताना दिसतेय. एका बाजूने करीना आणि तिचा छोटा मुलगा बाहेर येतो. तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या मागून तैमुर जात असतो. मात्र यावेळी चिडलेला जेह त्याच्या हातात असलेला एक कागदाचा बोळा जमिनीवर रागाने फेकून देतो. तो बोळा न उचलताच तो तसाच आत निघून जातो. त्याच्या मागे उभी असलेली करीना हे पाहते, मात्र ती त्याला काहीच म्हणत नाही. या तिघांसोबत असलेली नॅनी अखेर तो कागदाचा बोळा स्वत: उचलते. तेव्हासुद्धा करीना काहीच बोलत नाही. त्यामुळे मुलांना शिस्त शिकवण्यावरून नेटकऱ्यांनी करीनाची शाळा घेतली आहे.

पहा व्हिडीओ

‘ही अशी कशी आई आहे, जी मुलांना चांगल्या सवयी शिकवत नाही. तिने तिच्या मुलाला तो कागद उचलायला सांगितलं पाहिजे होतं’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘शिष्टाचार हा रोजच्या सवयीचा भाग असला पाहिजे आणि लहान मुलांना ते शिकवलं पाहिजे. मला या व्हिडीओत तीन जण असे दिसत आहेत, ज्यांना हा शिष्टाचारच माहीत नाही’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने सुनावलं आहे. तर काहींनी यामध्ये जेहची बाजू घेतली आहे. ‘लहान मुलांचे मूड्स सतत बदलत असतात. तो जसजसा मोठा होईल, तसतसं शिकत जाई. लहान मुलांबद्दल तरी अशी मतं बनवू नका’, असं काहींनी म्हटलंय.

करीना आणि सैफ यांच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत. या दोघांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केलं. त्यानंतर 2016 मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. फेब्रुवारी 2021 मध्ये करीना दुसऱ्यांदा आई बनली. जेह असं तिच्या छोट्या मुलाचं नाव आहे.