लाज वाटत नाही का?; करीना कपूरचा पाकिस्तानी डिझायनरसोबतचा फोटो पाहून नेटकरी संतापले

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पाहायला मिळते. अशातच अभिनेत्री करीना कपूर खानचा पाकिस्तानी डिझायनरसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहे.

लाज वाटत नाही का?; करीना कपूरचा पाकिस्तानी डिझायनरसोबतचा फोटो पाहून नेटकरी संतापले
Kareena Kapoor
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 29, 2025 | 3:01 PM

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दु:खद दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संताप उसळली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आहेत. याच दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा पाकिस्तानी डिझायनरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

करीनाने दुबईत पाकिस्तानी डिझायनरसोबत दिली पोज

समोर आलेल्या माहितीनुसार, करीना कपूर नुकतीच एका कार्यक्रमासाठी दुबईला गेली होती. तिथे तिची भेट प्रसिद्ध पाकिस्तानी फॅशन डिझायनर फराज मन्नानशी झाली. फराजने करीनासोबत काढलेली छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. एका फोटोवर त्याने लिहिले की, ‘ओजी करीना कपूरसोबत.’ फोटोंमध्ये करीना पांढऱ्या कॉर्सेट ड्रेसमध्ये दिसत आहे, तर फराज काळ्या टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसला.

वाचा: ‘याचा अर्थ तुम्ही नालायक…’, पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करताना शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा

सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी

करीना कपूर आणि फराज मन्नान यांचे फोटो समोर येताच चाहत्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. ट्विटरवर (आताच्या Xवर) एका युजरने लिहिले, ‘हिला पाकिस्तानला पाठवा.’ दुसऱ्याने लिहिले, ‘बॉलिवूडवाले तर देशद्रोहीच आहेत, यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा.’ अनेक युजर्सनी करीनाच्या या कृतीला लज्जास्पद आणि निर्लज्जपणाचे उदाहरण म्हटले. अनेक ठिकाणी ‘बॉयकॉट बॉलिवूड’ (#BoycottBollywood) हा ट्रेंड देखील सुरू झाला.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांविरोधात वातावरण

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जण शहीद झाले. त्यानंतर भारत सरकार आणि चित्रपटसृष्टीनेही पाकिस्तानी कलाकारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नुकतेच पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनावर बंदी घातली. तसेच, ‘सरदार जी 3’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हानिया आमिरलाही प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले आहे.

करीनाच्या फोटोंनी का वाढवला संताप

अशा संवेदनशील घटनेनंतर करीना कपूरच्या पाकिस्तानी डिझायनरसोबत पोज देते हे पाहून लोकांना खटकले. जिथे एकीकडे देश पाकिस्तानविरोधात संतप्त आहे, तिथे करीनाचे असे सार्वजनिक प्रदर्शन लोकांना चुकीचा संदेश देणारे वाटले. हेच कारण आहे की सोशल मीडियावर बहिष्कार आणि संतापाची लाट तीव्र झाली आहे. यावर करीना किंवा तिच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.