करीना-सैफ यांच्यातील वाद पोहोचले घटस्फोटापर्यंत, अभिनेत्री म्हणाली, ‘पैशांमुळे आमचे वाद…’

Kareena Kapoor - Saif Ali Khan: 'पैशांमुळे आमचे वाद...', इंडस्ट्रीमध्ये होणार आणखी एक घटस्फोट, सैफ - करीना यांच्यातील वाद, अभिनेत्री म्हणाली, 'वाद घटस्फोटापर्यंत पोहोचले आहेत...', सध्या सर्वत्र करीना कपूर - सैफ अली खान यांच्या नात्याची चर्चा...

करीना-सैफ यांच्यातील वाद पोहोचले घटस्फोटापर्यंत, अभिनेत्री म्हणाली, पैशांमुळे आमचे वाद...
| Updated on: Jul 20, 2024 | 3:07 PM

झगमगत्या विश्वात सध्या घटस्फोटाचं वार वाहत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत स्वतःचं आयुष्य नव्याने सुरु केलं आहे. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असताना अभिनेत्री करीना कपूर हिने देखील घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. करीना कपूर – सैफ अली खान यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत. लग्नानंतर करीना हिने दोन मुलांना जन्म देखील दिला आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करीना हिने घटस्फोटाबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री करीना कपूर  म्हणाली, ‘सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यामुळे मी पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार आणि डाऊन टू अर्थ झाली आहे. आम्ही एकमेकांमध्ये असलेल्या कमतरता पूर्ण करतो. मी त्रासलेली असेल तर, सैफ मला समजवतो. तर सैफ कधी त्रासलेला असेल तर मी त्याची समज काढते…

 

 

‘असं अनेकदा होतं एकाच घरात राहून देखील आम्ही एकमेकांना भेटत नाही. कारण कामामुळे आमची शिफ्ट वेगळी असते. व्यस्तवेळापत्रकामुळे काम आणि नात्यांवर प्रभाव पडतो. घरात देखील आमची कधी भेट होत नाही… त्यामुळे वाद देखील होतात…’

पुढे करीना म्हणाली, ‘अनेकदा असं झालं आहे की, आम्ही कॅलेंडर पाहातो आणि एक असा दिवस निवडतो, जेव्हा आम्ही एकत्र घरी राहातो आणि वेळ व्यतीत करतो… आमच्यात अनेक गोष्टींमुळे भांडणं देखील होतात. पण फार लहान गोष्टींमुळे…’

‘मला एसीचं तापमान 20 डिग्रीपर्यंत हवं असतं. पण सैफला प्रचंड गर्मी होते. त्याला 16 डिग्री सेल्सियस तापमान लागतं. अखेर प्रकरण तडजोडीपर्यंत येतं आणि आम्ही म्हणतो चला 19 ला तडजोड करू. त्यानंतर एसीचं तापमान 19 डिग्री सेल्सियसपर्यंत येतं… कारण मला माहिती आहे की, एसीच्या तापमानामुळे देखील घटस्फोट झाली आहेत.’

सतत होणाऱ्या भांडणांबद्दल देखील करीना हिने मोठं वक्तव्य केलं आहे. करीना म्हणाली, ‘व्यस्तवेळापत्रकामुळे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आमची भांडणं होतात. सैफ आणि माझ्यात कधीच पैसे आणि इतर कोणत्याच कारणांमुळे भांडणं झालेली नाहीत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.