करीना तिच्या बाथरूममध्ये सलमान खानचे पोस्टर का लावायची? करिश्माने केला खुलासा
अभिनेत्री करीना कपूर आणि सलमान खानने अनेक चित्रपटात काम केलं आहे. पण ती लहान असताना करीनाच्या बाथरुममध्ये सलमान खानचे पोस्टर लावलेले असायचे. आणि हे करिश्मा कपूरने एकदा सलमानला दाखवले होते. याचे कारणही तिने तेव्हा सांगितले.

करीना कपूर खान आणि सलमान खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ऑन-स्क्रीन जोडी देखील सर्वांना आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की सलमानच्या चित्रपटात काम करण्यापूर्वीही तिला सलमान खान एवढा आवडायचा कि तिच्या बाथरूममध्ये त्याचे पोस्टर लावायची.
करीना कपूरच्या बाथरूममध्ये सलमान खानचे पोस्टर का असायचे?
कपिल शर्मा त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनसह परतला आहे. हा शो नेटफ्लिक्सवरही स्ट्रीम होत आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शोचा पहिला पाहुणा सलमान खान होता. कपिलने आता त्याच्या यूट्यूब चॅनलवर या शोचे न पाहिलेले फुटेज शेअर केले आहे आणि या दरम्यान सलमानने करीना कपूरच्या बाथरूममधील पोस्टरबद्दलही सांगितलं. करीनाने त्याच्यानंतर दुसऱ्या अभिनेत्याचे पोस्टर कसे लावले हा किस्साही त्याने सांगितला.
करीनाने सलमाननंतर कोणाचे पोस्टर लावले?
कपिलने सलमानला विचारले की त्याचे पोस्टर कधी एखाद्या अनोळखी ठिकाणी लावले आहे का, ज्यावर त्याने उत्तर दिले, सलमान म्हणाला, ‘मी आणि करिश्मा त्यावेळी ‘निश्चय’ या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. या दरम्यान, करिश्माने मला सांगितले की, बेबोने म्हणजेच करीनाने माझे पोस्टर तिच्या बाथरूममध्ये लावले आहे. मात्र, यानंतर राहुल रॉय चा ‘आशिकी’ रिलीज झाला आणि बेबोने माझे पोस्टर फाडून त्या ठिकाणी राहुल रॉयचे पोस्टर लावले. शिवाय करीना स्वतःही आली आणि मला म्हणाली की सलमान आता तुझे पोस्टर माझ्या बाथरूममध्ये नाही. आता राहुल रॉयचे पोस्टर माझ्या बाथरुमध्ये आहे.
काही वर्षांपूर्वी ‘दस का दम’मध्ये करीना आणि करिश्मा या दोघींनी हजेरी लावली होती. सलमाननं या वेळी सांगितलेला हा किस्सा ऐकूण करीना हसू लागली. पुढे जेव्हा करीनाने मोठी झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली, तेव्हा तिने सलमानसोबत अनेक चित्रपट केले. यामध्ये ‘बॉडीगार्ड’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘मैं और मिसेस खन्ना’ या चित्रपटांचा समावेश आहे.
