‘मी त्याला किती मेसेज, फोन केले पण त्याने…’ शाहिद अन् करीनाचे नातं कसं तुटले? करीनाने स्पष्टच सांगितलं
करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या आधीच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. हे दोघेही आता आयुष्यात एक नवीन वळणावर आणि आपापल्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगत असले तरी त्यांच्या नात्याची चर्चा आजही होते. करीनाने एका मुलाखतीत त्यांच्या या नात्याबद्दल स्पष्टपणेच सांगितलं.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिचा पती अभिनेता सैफ अली खान आणि दोन मुले तैमूर आणि जेह यांच्यासोबत आनंदी जीवन जगत आहे. हे सर्वांनाच माहित असेल की सैफ अली खानच्या आधी करीना एकदा शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. करीना कपूरने स्वतः करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये याबद्दल स्पष्टपणे सांगितले होते.
शाहिद कदाचित त्याच्या या नात्यांबद्दल बोलणे टाळतो
दुसरीकडे, शाहिद कपूर अजूनही उघडपणे हे मान्य करायला तयार नाही की मीरापूर्वी त्याचे कधीही कोणाशीही गंभीर रिलेशनशिप होते. अलिकडेच,मज्यामध्ये तो असे म्हणत आहे की त्याच्या आयुष्यात कधीही एकही मुलगी आली नाही. तो एक ‘आनंदी विवाहित पुरुष’ आहे. शाहिद हे बोलताच, तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात. शाहिद कदाचित त्याच्या या नात्यांबद्दल बोलणे टाळतो, मात्र आजही त्यांच्या नात्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होती आणि आजही आहे.
असे अनेक कार्यक्रम आणि मुलाखती आहेत ज्यात दोघेही एकत्र दिसले आहेत. कॉफी विथ करणच्या चौथ्या सीझनमध्ये करीना आणि शाहिद एकत्र दिसले होते. करण जोहरने त्यांच्या मैत्री आणि नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारले होते.
‘अनेक वेळा फोन आणि मेसेज केल्यानंतर शाहिदने
शाहिद आणि करिनाची ओळख 2004 मध्ये आलेल्या ‘फिदा’ चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटात काम करत असताना करिनाला शाहिदविषयी आकर्षण झालं. इतकं की तिनेच शाहिदला प्रपोज केलं होतं. करिनाने एका जुन्या मुलाखतीत खुलासा करत सांगितलं होतं की, ‘अनेक वेळा फोन आणि मेसेज केल्यानंतर शाहिदने प्रपोजल स्वीकारलं.’ करीनाने करण जोहरच्या शोमध्ये खुलासा केला होता की तिनेच या नात्याची सुरुवात केली होती. तिने दोन महिने त्याचा पाठलाग केला होता.
View this post on Instagram
शाहिदसाठी करिना शाकाहारी झाली
‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान करीना आणि शाहिदचे प्रेम फुलले. दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले. कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनच्या एका भागात करण जोहर करीनाशी शाहिदबद्दल बोलताना दिसला. करणने खुलासा केला की जेव्हा करीना शाहिदला डेट करत होती तेव्हा ती खूप बदलली होती. तिने मांसाहारी खाणे देखील बंद केले आणि शाकाहारी झाली आणि यामुळेच तिचे वजन खूप वाढले. याशिवाय करणने असेही सांगितले की त्या काळात तिचा अध्यात्मावरील विश्वास वाढला होता.
शाहिद आणि करीनाचे नाते कसे तुटले?
शाहिद आणि करिना 2004 मध्ये एकमेकांना डेट करत होते, पण 2007 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की करीनाच्या आई आणि बहिणीमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. असे म्हटले जाते की बबिता आणि करिश्माने करीनाला हे नाते तोडण्यास भाग पाडले.
