Karisma Kapoor : करिश्मा कपूरचा मुलगा कोट्यावधींचा मालक, परदेशात डॉलरमध्ये करतो कमाई…

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता बेबोच्या मुलाबद्दल देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे... अभिनेत्रीचा मुलगा कोट्यवधींचा मालक असून परदेशात डॉलर्समध्ये पैसे कमवतो...

Karisma Kapoor : करिश्मा  कपूरचा मुलगा कोट्यावधींचा मालक, परदेशात डॉलरमध्ये करतो कमाई...
| Updated on: May 13, 2026 | 3:07 PM

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम सक्रिय असते. आता देखील आभिनेत्री तिच्या मुलामुळे चर्चेत आली आहे. पण अभिनेत्री तिच्या रियल नाही तर, रिल लाईफमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या या मुलाने बॉलिवूडचा निरोप घेत, उद्योग विश्वात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. परदेशात अभिनेत्रीचा ऑनस्क्रिन मुलगा डॉलर्समध्ये कमाई करत आहे. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, करिश्माचा हा ऑनस्क्रिन मुलगा आहे तरी कोण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या ऑनसक्रिन मुलाची चर्चा रंगली आहे.

करिश्माच्या ऑनस्क्रिन मुलाबद्दल सांगायचं झालं तर, ‘शक्ती’ सिनेमात करिश्मा मुख्य भूमिकेत झळकली होता. सिनेमात तिचा एक मुलगा देखील दाखवण्यात आलेला, जो आज प्रसिद्ध उद्योजक आहे आणि डॉलर्समध्ये कमाई करतो… तर जाणून घ्या कोण आहे ‘तो’ मुलगा…

20 सप्टेंबर 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शक्ती’ सिनेमात करिश्मा कपूर, नाना पाटेकर, शाहरुख खान आणि संजय कपूर यांसारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत काम करत होते. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला, पण सिनेमातील क्लासिक गाणी हीट ठरली.

सिनेमात मुख्य सेलिब्रिटींशिवाय एका मुलाने देखील काम केलं आहे. ज्याने करिश्माच्या मुलाची भूमिका साकारली होती आणि आपल्या निरागस चेहऱ्यांने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं… रिपोर्टनुसार, सिनेमात राजाची भूमिका साकारणाऱ्या मुलाचं नाव जय गिडवाणी आहे. विशेष म्हणजे, या सिनेमनंतर जयने चित्रपटसृष्टीपासून स्वतःला लांब ठेवलं आणि त्यानंतर त्याने कोणत्याही सिनेमात काम केलं नाही.

जय काही काळानंतर भारत सोडून गेला आणि आता स्पेनमधील ग्रॅन कॅनरिया येथे राहतो. रिपोर्टनुसार, तो तिथे एक प्रसिद्ध उद्योजक बनला आहे आणि भरपूर पैसे कमावतो. जय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा त्याच्या आयुष्यातील काही खास क्षण शेअर करत असतो. त्याच्या फोटोंवरून असे दिसते की, तो तिथे खूप आलिशान जीवन जगत आहे.

‘शक्ती’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘शक्ती’ हा 2002 चा कृष्णा वामसी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हिंदी ॲक्शन सिनेमा आहे. या सिनेमात करिश्मा कपूर, नाना पाटेकर आणि संजय कपूर प्रमुख भूमिकेत असून, शाहरुख खान, दीप्ती नवल, रितू शिवपुरी, अनुपम श्याम आणि प्रकाश राज सहाय्यक भूमिकेत दिसले.

Follow Us