
बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारं घराणं म्हणजे नक्कीच कपूर घराणे. या कुटुंबातील जवळपास सर्वच सेलिब्रिटी राहिले आहेत. या घराची पहिली मुलगी जिने बॉलिवूडवर राज्य केलं ती म्हमजे करिश्मा कपूर. एकामागून एक उत्तम चित्रपटांमध्ये काम करून या तिने पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केली. करिअरमध्ये जेवढं यश तिला मिळालं तेवढंच तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आणि संघर्षाचे राहिले. आता वयाच्या 50 व्या वर्षीही, या करिश्माचे नाव चाहत्यांच्या मनावर कायमच कोरलं आहे.
करिश्मासोबत घटस्फोटानंतर संजय कपूरने केलं तिसरं लग्न
करिश्माचं लग्न संजय कपूरशी झाले होते. मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट होण्यामागे करिश्माने अनेक धक्कादायक कारणे सांगितली होती. करिश्मा कपूरच्या एक्स पतीने मात्र घटस्फोटानंतर तिसरं लग्न केलं आहेत. त्याने हे तिसरं लग्न मॉडेल प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं.
प्रिया ही संजयची तिसरी पत्नी तर प्रियाचंही हे दुसरं लग्न
अभिनेत्री आणि मॉडेल प्रिया ही संजयची तिसरी पत्नी आहे, याआधी तिचे लग्न हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवालशी झाले होते. वृत्तानुसार, 10 दिवस चाललेल्या या शाही लग्नात 100 कोटी रुपये खर्च झाले होते आणि असे म्हटले जाते की126 देशांचे व्हीआयपी पाहुणे आले होते. परंतु, हे लग्न अवघ्या 5 वर्षातच मोडले. प्रियाला या विक्रमपासून एक मुलगी आहे, तर संजयसोबत लग्न केल्यानंतर तिला एक मुलगा आहे.
बॉलिवूडमध्ये यश मिळालं नाही
प्रिया सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा कमी सक्रिय आहे, परंतु तिच्या अकाउंटवर अजूनही अनेक ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. प्रियाच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात यशराज बॅनरच्या ‘नील अँड निक्की’ चित्रपटाने झाली. यामध्ये ती उदय चोप्रा आणि तनिषा चॅटर्जीसोबत दिसली. पण या चित्रपटामुळे तिच्या कारकिर्दीला कोणताही फायदा झाला नाही. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची विद्यार्थिनी असलेली प्रिया एक टॉप मॉडेल देखील राहिली आहे. तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरात चित्रपटातही काम केले.
प्रियामुळे करिश्माचा घटस्फोट?
2017 मध्ये करिश्मा कपूरच्या पतीशी दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर प्रिया सचदेव प्रसिद्धीच्या झोतात आली. 13 एप्रिल 2017 रोजी प्रियाने दिल्लीत उद्योगपती आणि करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरशी लग्न केले. प्रिया सचदेव ही संजय कपूरची तिसरी पत्नी आहे.
असे म्हटले जाते की प्रिया आणि संजय 2010 पासून एकमेकांना डेट करत होते, परंतु दोघांनीही हे कधीच मान्य केले नाही. करिश्मा कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय आणि प्रियाने लग्न केले. करिश्मा कपूरने प्रिया सचदेवमुळे संजय कपूरसोबतच्या तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या संघर्षामधील खरे कारण सांगितले होते. करिश्माने तिच्या तक्रार केली होती की प्रिया तिच्या घरात राहतं होती ज्यामुळे तिला मानसिक छळाला सामोरे जावे लागत होते.