
Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapur: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याचं लंडन याठिकाणी निधन झालं आहे. आता संजय याचं निधन भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 12 जून रोजी पोलो खेळताना अचानक संजय याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. संजय याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजय कपूर याच्या निधनाची चर्चा सुरु आहे.
संजय याच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्रसिद्ध उद्योजक असून सोशल मीडियावर कायम सक्रिय असायचा. संजय कायम आयुष्यावर आधारित पोस्ट शेअर करायचा. आता मृत्यूनंतर संजय याचे काही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 9 जून रोजी संजय याने एक पोस्ट केलेली. ज्यामध्ये ‘तुमचा पृथ्वीवरील वेळ मर्यादित आहे…’ असं लिहिलं होतं.
संजयने पोस्ट अशा अंदाजात केली. ज्यामुळे आधीच स्वतःच्या मृत्यूचा भास झाला होता का? असा देखील प्रश्न पडत आहे. सध्य संजय याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 10 जून रोजी देखील त्याने पोस्ट शेअर केली होती. सध्या संजयच्या पोस्ट तुफान चर्चेत आहेत.
Progress demands bold choices, not perfect conditions. #MondayMotivation pic.twitter.com/vapd8KkOuU
— Sunjay Kapur (@sunjaykapur) June 9, 2025
पोस्टमध्ये संजय म्हणाला, ‘काय होणार… हा विचार बाजूला ठेवून, का होऊ शकत नाही… असा मार्ग निवडा… महत्त्वाचं म्हणजे परिपूर्ण परिस्थिती नाही तर धाडसी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.’ असं लिहित त्याने #MondayMotivation असं देखील लिहिलं होतं. आता संजय याच्या निधनानंतर त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून नेटकरी भावूक होत आहेत.
संजयच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘संजयला मृत्यूची जाणीव होती का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आयुष्य खरोखरच खूप अप्रत्याशित आहे….’ सध्या सर्वत्र त्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
संजय कपूर याने अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर मुलाच्या जन्मानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये करिश्मा – करीना विभक्त झाले आणि 2016 मध्ये त्यांनी घेटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.
करिश्मा कपूर हिला घटस्फोट दिल्यानंतर संजय कपूर याने 2017 मध्ये तिसरं लग्न प्रिया सचदेव हिच्यासोबत केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. संजय आणि प्रिया यांच्या मुलाचं नाव अजारियस कपूर असं आहे. संजय त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला.