मैदानातच झोपवलं, सलाईन लावली, हेलिकॉप्टर मागवलं… करिश्माच्या नवऱ्याचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapur: संजय कपूरच्या निधनाने कुटुंबियांना मोठा धक्का, शेवटचा धक्कादायक व्हिडीओ अखेर समोर, बेशुद्ध अवस्थेत संजय कपूर, करिश्माच्या पूर्व पतीला देण्यात आलेला CPR

मैदानातच झोपवलं, सलाईन लावली, हेलिकॉप्टर मागवलं... करिश्माच्या नवऱ्याचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Jun 21, 2025 | 11:01 AM

Karisma Kapoor Ex Husband Sunjay Kapur: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्व पती संजय कपूर याचं 12 जून रोजी इंग्लंड याठिकाणी निधन झालं. संजय कपूर याच्या निधनानंतर व्यवसाय विश्वाला मोठा धक्का बसला आहे. 53 वर्षीय संजय याचं निधन पोलो खेलताना मधमाशी गिळल्यामुळे झालं आहे. मधमाशी गिळल्यामुळे संजय याला श्वास घेण्यास त्रास झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूर याचं निधन झालं. मृत्यूच्या 8 – 9 दिवसांनंतर संजय कपूर याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो संजय कपूरचा शेवटचा बचाव व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे.

व्हिडिओ भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू आणि संजय कपूरचा मित्र अजित नंदलने 14 जून रोजी एक्स वर शेअर केला. दोघेही एकत्र पोलो खेळायचे. अजितने व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘संजय कपूरचा शेवटचा रेस्क्यू व्हिडिओ. सज्जन जैसल आणि संजयच्या टीममध्ये एक सामना होता. सज्जनही तिथे होता.’

 

 

व्हिडीओ यूके येथील आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती जमीनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसत आहे. व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. पण अजीत यांच्या म्हणण्यानुसार, व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती संजय कपूर आहेत. व्यक्तीला CPR देण्यात येत आहे. व्हिडीओबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हे मैदान संजयच्या शेवटच्या फोटोमध्ये दिसत होतं तसेच काहीसं दिसत आहे. संजयच्या मित्राच्या पोस्टनुसार, त्या दिवशीचा सामना संजय कपूरच्या टीम आणि सज्जन जैसलच्या टीममध्ये होता.

संजय कपूरच्या निधनाने मोठा धक्का, अंतिमसंस्कारासाठी करिश्मा आणि मुलं

संजय कपूर याचं अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का लागला आहे. 19 जून रोजी दिल्लीत संजयचं अंत्यसंस्कार झालं, ज्यामध्ये त्यांची पत्नी प्रिया सचदेव व्यतिरिक्त, दुसरी पत्नी करिश्मा कपूर आणि त्यांची दोन्ही मुले उपस्थित होती. वडिलांचं अखेरचं दर्शन घेताना कियान आणि समायरा ढसाढसा रडू लागले.