Ahmedabad plane crash: अहमदाबाद विमान अपघातात प्रसिद्ध फिल्ममेकरचं निधन, DNA टेस्टमध्ये कंफर्म
Ahmedabad plane crash: अहमदाबाद विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर, प्रसिद्ध फिल्ममेकरने गमावले प्राण, DNA टेस्टमुळे कंफर्म, मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला..., कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Ahmedabad plane crash: अहमदाबाद विमान अपघातामध्ये तब्बल 270 लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे DNA टेस्ट करून मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले होते. अपघातात एक प्रसिद्ध गुजराती फिल्ममेकरचं देखील निधन झालं आहे. DNA टेस्ट कंफर्म झाल्यानंतर फिल्ममेकरचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला आहे. फिल्ममेकरचं नाव महेश कलावाडिया उर्फ महेश जीरावाला आहे. फिल्ममेकरच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, महेश याचं शेवटचं लोकेशन घटनास्थळापासून 700 मीटर अंतरावर होतं. त्यामुळे DNA टेस्टसाठी कुटुंबियांनी नमुने दिले होते. अखेर टेस्ट कंफर्म झाल्यानंतर फिल्ममेकरच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
अनेक गुजराती पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघातानंतर दुर्घटना स्थळावरून महेश जिरावालाची जळालेली अॅक्टिव्हा स्कूटर सापडली, त्यामुळे फिल्ममेकरचं देखील निधन झालं असावं.. असा संशय व्यक्त करण्यात आला. त्याचा मोबाईल फोन शेवटचा अपघातस्थळी ट्रॅक करण्यात आला होता, जिथे तो बंद आढळला. या संकेतांवरून तो बळी पडलेल्यांपैकी एक असण्याची शक्यता दिसून आली.
फिल्ममेकरचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला
डीएनए टेस्ट कंफर्म झाल्यानंतर महेश जीरावाला याच्या कुटुंबियांना मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. कारण असं काही झालं असेल… यावर कुटुंबियांचा विश्वासच बसत नव्हता. तथापि, अखेर पोलिसांनी अॅक्टिव्हाचा नंबर आणि डीएनए रिपोर्ट यांसारखे भक्कम पुरावे सादर केले तेव्हा कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि महेश आता नाही हे अनिच्छेने स्वीकारावे लागले.
कोण होता महेश जीरावाला?
महेश जीरावारा नरोदा येथील राहणारा होता. शिवाय तो म्यूझिक व्हिडीओसाठी दिग्दर्शनाचं काम करायचा. ते महेश जिरावाला प्रॉडक्शन्स या प्रॉडक्शन हाऊसचे सीईओ देखील होते. त्यांनी गुजराती भाषेत अनेक म्युझिक व्हिडिओ केले होते. 2019 मध्ये त्यांचा एक सिनेमाही आला होता जो त्याने दिग्दर्शित केला होता.
महेश जीरावारा याच्या कुटुंबात एक मुलगी, मुलगा आणि पत्नी हेतल आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, अहमदाबाद दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 231 डीएनए जुळले आहेत आणि 210 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. मृतांमध्ये 155 भारतीय, 36 ब्रिटिश नागरिक, सात पोर्तुगीज नागरिक, एक कॅनेडियन आणि नऊ स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.
