‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीने सोडलं भारत; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!

| Updated on: Mar 23, 2023 | 3:51 PM

एरिकाला 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतून ओळख मिळाली. यामध्ये तिने शाहीर शेखसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.

कसौटी जिंदगी की फेम अभिनेत्रीने सोडलं भारत; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!
Erica Fernandes
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारणारी प्रसिद्धा टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. एरिका भारत सोडून दुबई स्थायिक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती तिथेच राहतेय. फक्त कामानिमित्त ती भारतात ये-जा करतेय. भारत सोडण्यामागचं कारण सांगताना एरिका असंही म्हणाली की दुबईहून मुंबईला पोहोचणं हे गोरेगावहून नायगावला पोहचण्यापेक्षा अधिक सोपं आणि जलद आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

भारत का सोडलं?

“मी प्रगतीच्या शोधात होते. तुम्ही किती काम केलंस याविषयीचा मुद्दा नव्हता. पण आता यापुढे काय, असा प्रश्न मला सतत पडत होता. कुठेतरी माझी प्रगती कमी झाली आहे असं मला वाटत होतं. कामात तोच-तोचपणा जाणवत होता आणि मला पुढे बरंच काही करायची इच्छा आहे. मला ते पुढचं पाऊल उचलणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मी दुबईत शिफ्ट झाले. इथे बऱ्याच घडामोडी घडत आहेत”, असं एरिका म्हणाली.

हे सुद्धा वाचा

एरिकाने पुढे सांगितलं, “दुबई हे माझ्यासाठी नेहमीच घरासारखं आहे. इथं येणं म्हणजे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं असं नाही. पण माझे कुटुंबीय इथे राहतात आणि दुबईत राहण्याविषयी मला भीती नाही वाटत. मात्र कामासाठी मी मुंबईला ये-जा करत राहीन.”

दुबईत राहण्याचा अनुभव

“इतर अनेक गोष्टींप्रमाणे, दुबई ही खूप सुंदर जागा आहे. हे ग्लोबल हब आहे जिथे एकाच छताखाली वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वाचे लोक राहतात. एका देशात राहून आपल्याला जगातील वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते. इथल्या पायाभूत सुविधा अभूतपूर्व आहेत. एक रहिवासी म्हणून गेल्या काही महिन्यांमधील माझा इथला अनुभव खूप चांगला आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात राहायला जाता, तेव्हा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि हा धाडसी अनुभव वेगळाच असतो”, असंही एरिका म्हणाली.

एरिका दुबईत राहायला गेली असली तरी भारतातील तिचं अभिनयाचं काम ती करतच राहणार आहे. “कामासाठी भारतात येणं आता खूप सोपं झालं आहे. इतकंच नव्हे तर दुबईहून मुंबईला सेटवर येणं हे गोरेगावहून नायगावला जाण्यापेक्षा खूप जलद आहे”, अशी मस्करी तिने केली.

एरिकाला ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून ओळख मिळाली. यामध्ये तिने शाहीर शेखसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यानंतर तिने ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेत पार्थ समथानसोबत भूमिका साकारली. या दुसऱ्या सिझनमध्ये हिना खानने कोमोलिकाची भूमिका साकारली होती.