
कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका केटी पेरी यांनी अखेर डेटिंगच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केला आहे. कॅलिफोर्नियातील सँटा बार्बरा किनाऱ्यावरील एका नौकेवर हे दोघं इंटिमेट होताना दिसले. केटी पेरीला किस करतानाचा जस्टिन यांचा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये 40 वर्षीय केटी यॉटच्या डेकवर स्विमसूटमध्ये दिसून येत आहे. तर 53 वर्षीय जस्टिन ट्रुडो शर्टलेस आहेत. यॉटवर एकमेकांना मिठी मारताना आणि किस करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत.
यावर्षी जून महिन्यात केटी पेरीने ऑरलँडो ब्लूमशी साखरपुडा मोडला होता. त्याच्या एक महिन्यानंतर जुलैमध्ये तिला जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत सर्वांत पहिल्यांदा पाहिलं गेलं होतं. हे दोघं माँट्रियलच्या ले वायोलॉन इथं एकत्र जेवायला जाण्यासाठी पाळीत श्वानासोबत एकत्र फेरफटका मारत होते. विशेष म्हणजे केटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूम यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. तर दुसरीकडे जस्टिन ट्रुडो यांनी लग्नाच्या 18 वर्षांनंतर पत्नी सोफी ग्रेगॉईरला 2023 मध्ये घटस्फोट दिला होता. या दोघांना तीन मुलं आहेत. मात्र केटी आणि जस्टिन यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
केटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूम यांची पहिली भेट 2016 मध्ये झाली होती. ‘गोल्डन ग्लोब’ या जगप्रसिद्ध पुरस्कार सोहळ्याच्या आफ्टरपार्टीमध्ये दोघं एकमेकांना भेटले होते. त्यानंतर 2019 मध्ये ‘व्हॅलेंटाइन डे’ला त्यांनी साखरपुडा केला होता. त्याच्या वर्षभरातच 2020 मध्ये केटीने मुलीला जन्म दिला. केटी आणि ऑरलँडो यांच्या मुलीचं नाव डेझी डव्ह ब्लूम असं आहे.
New photos have surfaced allegedly showing Katy Perry and Justin Trudeau as a couple.
The two were seen kissing aboard a yacht off the coast of Santa Barbara, California. pic.twitter.com/xNBhV2aKwC
— Shadow of Ezra (@ShadowofEzra) October 11, 2025
ट्रुडो यांना जुलैमध्ये मॉन्ट्रियलच्या बेल सेंटरमध्ये केटी पेरीच्या म्युझिक टूरमध्येही पाहिलं गेलं होतं. यॉटवरील दोघांचा किसिंगचा फोटो सप्टेंबर महिन्यातला असल्याचं म्हटलं जात आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने ‘डेली मेल’शी बोलताना सांगितलं, “केटी पेरी नेमकी कोणासोबत होती, हे मला लगेच समजलं नव्हतं. पण जेव्हा मी त्या व्यक्तीच्या हातावरील टॅटू पाहिला, तेव्हा मला लगेच समजलं की ते जस्टिन ट्रुडो होते.” दरम्यान केटी पेरी आणि जस्टिन ट्रुडो यांनी या व्हायरल फोटोंवर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.