VIDEO ‘कौन बनेगा करोडपती 16’ चा शेवट, निरोप घेताना अमिताभ बच्चन भावूक, प्रेक्षकही रडले

KBC16 : 'कौन बनेगा करोडपती 16' या शोची आता लवकरच सांगता होणार आहे. या शोच्या शेवटच्या भागाचं शूटींग पूर्ण झालं आहे. शेवटच्या भागात या शोचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यावेळी ते भावूक झालेले पाहायला मिळाले.

VIDEO कौन बनेगा करोडपती 16 चा शेवट, निरोप घेताना अमिताभ बच्चन भावूक, प्रेक्षकही रडले
KBC 16 ends, Amitabh Bachchan gets emotional
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 13, 2025 | 1:50 PM

अमिताभ बच्चन गेल्या 25 वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’सोबत जोडलेले आहेत. वयाच्या 57 व्या वर्षी, बॉलिवूड सुपरस्टारने या रिअॅलिटी शोसह त्याच्या कारकिर्दीची दुसरी इनिंग सुरू केली. या शोने बराच काळ प्रचंड टीआरपी मिळवला होता. पण आता ओटीटीची वाढती क्रेझ आणि सोनी टीव्हीची कमी होत चाललेली लोकप्रियता यामुळे या शोचे रेटिंग दिवसेंदिवस कमी होत आहे. असे ऐकायला मिळतं आहे की केबीसीचे निर्माते अमिताभ बच्चन यांच्या जागी दुसरा व्यक्तीचा विचार करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावरील रेटिंग्जचा दबाव वाढल्याचंही म्हटलं जात आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या 16 वा सीझन अंतिम टप्प्यात

दरम्यान कौन बनेगा करोडपतीच्या 16 वा सीझन आता अंतिम टप्प्यात आहे. केबीसी 16 च्या शेवटच्या एपिसोडचं शूटींग पूर्ण झालं आहे. शेवटच्या भागामध्ये अमिताभ बच्चन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी कौन बनेगा करोडपतीच्या 25 वर्षांच्या प्रवासात सपोर्ट केल्याबद्दल लोकांचे आभार मानले.

VIDEO: अमिताभ बच्चन भावूक 

अमिताभ बच्चन यांचा या शोच्यासेटवरील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ते म्हणालेत की, “प्रत्येक एपिसोडमध्ये ते स्पर्धकांना हॉट सीटवर बसण्यासाठी फक्त 1 ते 2 दिवस बाकी आहेत, असं सांगत दिलासा द्यायचे. पण आता ते स्पर्धकांना तसं सांगू शकणार नाहीत. कारण अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे.” असं म्हणत त्यांनी या शओची सांगता लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत.


“मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम दिलं”

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, त्यांच्या आसपास असलेल्या तीन महाशक्तींमुळे ते या शोच्या केंद्रस्थानी बसत आहेत. त्या तीन महाशक्ती म्हणजे स्पर्धक, शोमध्ये बसलेले लोक आणि घरी बसलेले लोक. “या महाशक्तींमुळेच मी हा शो करण्याचं धाडस करतो. प्रत्येक सीझनच्या सुरुवातीला मला इतक्या वर्षांनंतर लोकांच्या डोळ्यांमध्ये तेच प्रेम बघायला मिळेल का, असा विचार ते करत असतात. पण सीझन संपल्यावर जाणवतं की या मंचाने मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे. हे प्रेम कायम टिकून राहावं, हीच इच्छा आहे” असं म्हणत त्यांनी मनातील भावना बोलून दाखवल्या.पण हे सर्व बोलत असताना अमिताभ बच्चन भावूक झाल्याचही दिसलं.