
पतौडी कुटुंबाची लाडकी लेक आणि अभिनेत्री सारा अली खान तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. नुकताच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका भाजप नेत्यासोबत दिसून आली. विशेष म्हणजे हे दोघं पहिल्यांदाच एकत्र दिसले नाहीत. तर याआधी दोघं एकमेकांसोबत व्हेकेशनलाही गेले आहेत. आता पुन्हा एकदा या दोघांच्या व्हिडीओमुळे अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये सारा आणि भाजप नेता एका गुरुद्वारामधून बाहेर येताना दिसून येत आहेत. हा भाजप नेता दुसरा-तिसरा कोणी नसून अर्जुन बाजवा आहे. या व्हिडीओमध्ये सारा पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून येत आहे. तिने डोक्यावर दुपट्टा घेतला आहे. तर अर्जुन यामध्ये कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसला. हे दोघंही नंतर वेगवेगळ्या गाडीत बसले. त्याआधी सारा अर्जुनकडे हात दाखवून त्याला निरोप देते. या व्हिडीओवरून दोघांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. ‘आता पतौडी कुटुंबाची लेक पंजाबी कुटुंबाची सून होईल’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हा पतौडी कुटुंबाचा भावी जावई आहे’, असं दुसऱ्याने लिहिलंय.
याआधी सारा अली खान आणि अर्जुन बाजवा हे गोवा आणि राजस्थानच्या व्हेकेशनमध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय दोघं एकत्र केदारनाथलाही गेले होते. गेल्या आठवड्यात दोघांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता, जो हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती इथल्या झलमत पाटण व्हॅलीचा होता. दोघंही तिथल्या मॅगी पॉईंटवर एकत्र दिसले होते.
सारा अली खानसोबत दिसलेल्या अर्जुन बाजवाचं पूर्ण नाव अर्जुन प्रताप बाजवा आहे. तो अभिनेता, सुपरमॉडेल आणि एमएमए फायटरसुद्धा आहे. अर्जुनच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असून तो स्वत: भाजपचा नेता आहे. अर्जुनचे वडील फतेह जंग सिंह बाजवा हे पंजाबचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सध्या भाजप पंजाबचे उपाध्यक्ष आहेत. याआधी ते काँग्रेसमध्ये आमदार होते. अर्जुनने ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटात काम केलंय. तो ऑस्कर नामांकित ‘बँड ऑफ महाराजा’ या चित्रपटातही दिसला होता.