Video: साइड ओपन ड्रेसमध्ये दिसली खुशी मुखर्जी, वारा आला अन् हाताने लपवले प्रायवेट पार्ट

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये खुशी मुखर्जी तिच्या रिलिविंग ड्रेसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Video: साइड ओपन ड्रेसमध्ये दिसली खुशी मुखर्जी, वारा आला अन् हाताने लपवले प्रायवेट पार्ट
Khushi Mukharji
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 28, 2025 | 2:38 PM

बॉलिवूड अभिनेत्री खुशी मुखर्जी तिच्या रिविलिंग ड्रेसमुळे कायमच चर्चेत असते. तिचा एक नवा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका कॅफेबाहेर खुशी दिसली होती. फोटोग्राफर्सही तिचे फोटो काढण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, खुशीने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने दोन्ही साइटला ओपन असा ड्रेस घातला होता. वारा आल्यामुळे खुशीला ड्रेस हाताने पकडावा लागाला आहे.

खुशी मुखर्जीने पुन्हा ओलांडली मर्यादा

खुशी मुखर्जीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा टी-शर्ट ड्रेस घातला आहे. जो दोन्ही बाजूने उघडा आहे. हा ड्रेस घालून खुशी जेव्हा गाडीतून उतरते, तेव्हा तिचा ड्रेस उडू लागतो. त्यानंतर अभिनेत्रीला हाताने आपले खासगी अवयव लपवावे लागले.

वाचा: डायबिटीज होण्यापूर्वी कोणती लक्षणे जाणवतात? वेळीच सावध व्हा, वाचा डॉक्टर काय सांगतात

दरम्यान, खुशी फोटोग्राफर्सला म्हणते, ‘थांबा क्लिक करु नका. क्लिक तुम्ही करता आणि बदनामी माझी होते.’ खुशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. युजर्स आता अभिनेत्रीला जोरदार ट्रोल करत आहेत आणि म्हणत आहेत, ‘जेव्हा दाखवण्यासाठीच घातले आहे, तर लपवायचे काय?’ दुसऱ्याने म्हटले, ‘मग असे कपडे का घालायचे?’

फलकने घेतली खुशीची शाळा

अभिनेत्री फलक नाझने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत खुशीची चांगलीच शाळा घेतली. फलक म्हणाली, ‘जर कोणी रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालत असेल तर खूप गोंधळ होतो. मग आता मी सरकारला विचारते की, अशा लोकांवर बंदी का घालण्यात येत नाही? ही मीडिया जे यांना कव्हर करते आणि जे कव्हर केले जाते, त्यांच्यावर दंड लावला पाहिजे, कारण आपण समाजात राहतो, तिथे असे कपडे घालून फिरणे योग्य आहे का? मला याचे उत्तर हवे आहे.’

यापूर्वीही फलकने व्यक्त केला होता खुशीवर राग

खुशी आणि फलक यांच्यातील वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा खुशीने फलकला बेरोजगार म्हटले होते. त्यानंतर फलकने उत्तर देताना म्हटले होते, ‘किमान आम्ही रस्त्यावर अर्धनग्न होऊन फिरत नाही.’