यश सोबतच्या ‘त्या’ सीन्सने कियारा नाराज, ‘टॉक्सिक’ मेकर्सकडे केली ही मागणी

नुकतीच आई झालेली अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या अपकमिंग 'Toxic: A Fairy Tale for Grown-Ups' चित्रपटात नजर येणार आहे. तिची मुलगी साराया मल्होत्रा हिच्या जन्मानंतर तिचा पहिला प्रोजेक्ट आहे.

यश सोबतच्या त्या सीन्सने कियारा नाराज, टॉक्सिक मेकर्सकडे केली ही मागणी
Toxic: A Fairy Tale for Grown-Ups
| Updated on: May 03, 2026 | 5:54 PM

बॉलीवुड अभिनेत्री कियारा आडवाणी अलिकडे तिच्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’ चित्रपटावरुन चर्चेत आहे. आई झाल्यानंतर प्रथमच कियारा आडवाणी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिचा आगामी चित्रपट ‘टॉक्सिक: ए फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ वरुन चाहते उत्सुक आहेत. मात्र, हा चित्रपट रिलीजच्या आधीच वादविवाद आणि चर्चेत अडकला आहे. ताज्या बातम्यांनुसार कियारा हीने चित्रपटातील काही सीन्सवरुन मेकर्ससमोर तिच्या हरकती घेतल्या आहेत. यामुळे चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शन वरुन नवा वाद सुरु झाला आहे.

कियारा आडवाणी हीचे म्हणणे काय ?

‘Gulte’ च्या बातमीनुसार कियारा आडवाणी हीने ‘टॉक्सिक’चित्रपटाचा अंतिम आऊटपुट पाहिल्यानंतर दिग्दर्शक गीतू मोहनदास आणि अभिनेता यश याला एक खास विनंती केली आहे. असे म्हटले जात आहे की कियारा हीने चित्रपटातील काही इंटीमेट सीन्स हटवण्याची किंवा त्यांची लांबी कमी करण्याची मागणी केली आहे.

कियारा हीने यश सोबत काही बोल्ड सीन चित्रित केले होते. शुटींगच्या वेळी तिला दिग्दर्शकाने विश्वासात घेत सांगितले की हे सीन तिच्या कम्फर्ट झोन लक्षात घेऊन चित्रित केले जातील. मात्र, पडद्यावर अंतिम एडिटिंग पाहिल्यानंतर अभिनेत्रीने या सीन्सचे प्रेझेंटेशन तिच्या विचारांपेक्षा थोडे वेगळे वाटले. ज्यामुळे तिने त्यात बदल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बातमीत हा देखील दावा केला आहे की कियाराने ‘टॉक्सिक’ च्या मेकर्सना स्पष्ट पणे सांगितले की या सीन्सना खूप छोटे करावे किंवा फायनल कटमध्ये त्यांना थोडे ‘सॉफ्ट’ केले जावे. आई झाल्यानंतर आपली नवीन इनिंग सुरु करताना कियारा कदाचित तिच्या स्क्रीन इमेज संदर्भात आता थोडी जास्त सतर्क झाली आहे. मात्र, या दाव्यात किती सत्यतात आहे याची अधिकृत माहिती आलेली नाही. आतापर्यंत कियारा आडवाणी किंवा चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसच्या वतीने कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

टीझरमुळे आधीच झाला वाद

हा चित्रपट रिलीज होण्याआधीच काही सीन्स दाखवल्याने वादात सापडला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये यशला ‘राया’ नावाच्या एका गँगस्टरच्या रुपात दाखवले आहे. टीझरच्या एका सीनमध्ये तो कब्रस्थानच्या जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये महिलेसोबत सेक्स करताना दिसत आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. या चित्रपटाची स्टारकास्ट खूप तगडी आहे. यात तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि नयनतारा सारखे दिग्गज कलाकार सामील आहेत.

येथे पोस्ट पाहा –

रिलीज डेट दोनदा बदलली –

तुम्हाला ही माहिती जाणून आश्चर्य वाटेल की ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या रिलीजची डेट दोनदा पुढे ढकलल्यात आली आहे.आधी हा चित्रपट १९ मार्च रोजी रिलीज होणार होता. नंतर तो ४ जूनला रिलीज करण्याचा निर्णय घेता आला असता. मात्र, २९ एप्रिल रोजी यश याने एक पोस्ट करुन या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचे सांगितले. आता नव्या तारखेची वाट पाहिली जात आहे.

Follow Us