Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण 9’ नंतरही गॉसिपचा तडका कायम ! करण जोहर नव्या शोमधून करणार कमबॅक?
Karan Johar : 'कॉफी विथ करण' हा चॅट शो आता अंतिम टप्प्यात आहे. आयकॉनिक 9व्या सीझननंतर हाँ शो बंद होणार आहे. मात्र त्यानंतर करण जोहरची वाटचाल थांबणार नसून लवकरच तो नव्याने दिसू शकतो, अशी चर्चा आहे.

Karan Johar : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि गॉसिपने भरलेला टॉक शो ‘कॉफी विथ करण’ ( Koffee With Karan) आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. करण जोहरने याबाबत घोषणा केल्याचे सांगितले जात असून, शोचा नववा सीझन शेवटचा ठरणार असल्याचे वृत्त आहे. हा सीझन 14 ऑक्टोबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अंतिम सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार, याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अहान पांडे, अनीत पड्डा, विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, अनन्या पांडे आणि अनन्या बिर्ला यांची नावे संभाव्य पाहुण्यांच्या यादीत चर्चेत आहेत. मात्र, हा शो संपल्यानंतर करण जोहर (Karan Johar) प्रेक्षकांसाठी नवा चॅट शो घेऊन येणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
करण जोहरच्या नव्या शोची तयारी सुरू ?
‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, ‘कॉफी विथ करण’चा प्रवास संपला तरी करण जोहर टॉक शोच्या विश्वातून दूर जाण्याची शक्यता कमी आहे. ‘कॉफी विथ करण’ या शोचे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (IP) जिओ हॉटस्टारकडे असल्याने करण स्वतःच्या प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत एक नवीन चॅट शो सुरू करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. या नव्या शोमध्येही गप्पा, सेलिब्रिटींचे किस्से आणि गॉसिपचा रंग पाहायला मिळू शकतो.
सध्या अनेक डिजिटल शो आधी यूट्यूबवर लोकप्रिय होतात आणि त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होतात. हाच पर्याय करण जोहरही निवडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नव्या शोबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या करणचं लक्ष ‘कॉफी विथ करण 9’च्या तयारीवर असल्याचे सांगितले जात आहे.
सलमान, शाहरूख, रणबीरही येणार ?
‘कॉफी विथ करण 9’मध्ये यंदा अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या वृत्तानुसार, सलमान खान यांनी गुरुवारी त्यांच्या एपिसोडचे शूटिंग केले आहे. शोची सुरुवात आलिया भट्टच्या एपिसोडने होऊ शकते, अशीही चर्चा आहे. मात्र, सलमान खान यांचाही पहिल्या एपिसोडसाठी विचार होऊ शकतो. अभिनेत्री आलिया भट्ट ही पती रणबीर कपूर आणि ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातील सहकलाकार विकी कौशल यांच्यासोबत शोमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, शाहरुख खान आणि त्यांचा मुलगा आर्यन खान हे देखील एकत्र दिसू शकतात, अशी चर्चा आहे.
एकूणच, ‘कॉफी विथ करण’चा नववा सीझन प्रेक्षकांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे. शोचा निरोप घेतल्यानंतर करण जोहर नव्या चॅट शोमधून पुन्हा गॉसिपचा धमाका करणार का, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
कधी झाली होती सुरूवात ?
‘कॉफी विथ करण’ शो बद्दल सांगायचं झालं तर करण जोहरने या शोचा पहिला एपिसोड हाँ 16 ऑगस्ट 2004 साली शूट केला होता. गेल्या 20 वर्षांपेक्षै अधिक काळात या शोचे 8 सीझन आले असून 161 एपिसोड टेलिकास्ट झाले. य 8 सीझन्समध्ये सर्वात चर्चेत असलेला आणि मोठा सीझन म्हणजे, ज्यामध्ये अनेक स्टार्सची नातं, ब्रेकअप्स, आणि वादांवर मोकळेपणाने चर्चा झाली. हाँ तोच सीझन, ज्यामधून ‘नेपोटिझम’ सारख्या मोठ्या डिबेटची देखील चर्चा सुरू झाली होती.