Madhuri Dixit : माधुरीला ‘त्या’ निर्णयाचा आजही पश्चाताप, अनेक वर्षांनंतर स्पष्टच म्हणाली…

Madhuri Dixit : माधुरी दीक्षित हिने नुकताच मोठा खुलासा करत, घेतलेल्या 'त्या' निर्णयावर पश्चातापाची भावना व्यक्त केला... यावेळी तर धकधक गर्ल स्पष्टच म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी दीक्षित हिची चर्चा रंगली आहे.

Madhuri Dixit : माधुरीला त्या निर्णयाचा आजही पश्चाताप, अनेक वर्षांनंतर स्पष्टच म्हणाली...
अभिनेत्री माधुरी दीक्षित
| Updated on: Oct 12, 2026 | 9:07 AM

Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत माधुरी हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर देखील राज्य केलं. आता अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कामय चर्चेत असते. आता माधुरी ‘Kon Honar Crorepati’ शोचं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हॉट सीटवर दिसणार आहे. ज्याचा प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये सोनाली, माधुरीला विचारते, ‘असा कोणता सिनेमा आहे, तो सिनेमा केल्याचा तुला आजही पश्चाताप होतो…’, यावर माधुरी हिने विनोदी अंदाजात मोठा किस्सा सांगितला आहे.

सोनाली बेंद्रे हिच्या प्रश्नाचं उत्तर देत माधुरी दीक्षित म्हणाली, ‘एक असा सिनेमा आहे. एका सिनेमात मला त्रास झाला कारण दिग्दर्शकच असा हायव्होलटेज होता. त्याचा प्रत्येक सीन वरच्या पातळीवरुन सुरु व्हायचा आणि माझं असं म्हणणं असायचं की, आपण हळू हळू प्रत्येक सीन पूर्ण करुया.. या कारणामुळे कायम आमच्यात वाद व्हायायचे. पण काहीही सांगितलं तरी तो स्पष्ट नकार द्यायचा…’

Loading...

 

 

पुढे माधुरी म्हणाली, ‘तो असं सांगायचा आणि बोलता बोलता तो कुठेतरी नाहिसा व्हायचा… कुठे गेला.. म्हणून शोधायला लागल्यानंतर तो टेबलाखाली रडत बसलेला असायचा…. तो प्रचंड रडायचा… मी ट्रॉली शॉट देत होते आणि डायलॉग होते, ‘तुमने ऐसा क्यू किया…’ आणि एका कोपऱ्यातून मला आवाज येत होते. तर माझं लक्ष विचलित झालं, मी पाहायला गेले काय झालं तर, माझे दिग्दर्शक ट्रॉलीवर बसून रडत होते.’, किस्सा माधुरी दीक्षित हिने सांगितला.

‘कोण होणार करोडपती’ शोबद्दल सांगायचं झालं तर, शो 12 ऑक्टोबर पासून प्रसारित होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांना प्रश्न – उत्तरांच्या खेळाचा आनंद घेता येणार आहे. तर एकाच प्लॅटफॉर्मवर सोनाली आणि माधुरी हिला पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली माधुरी यांची चर्चा रंगली आहे. अशाच ‘कोन बनेगा करोडपती’च्या एपिसोडमध्ये दोघी किती रंग भरतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us