Kriti Sanon : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या क्रिती सनॉनच्या आईने आलिया भट्टला फटकारलं

कॉफी विथ करणमध्ये पाहुणी म्हणून आलेल्या सोनम कपूरने त्यावेळी क्रिती आणि कियारा अडवाणीला कमी लेखलं जात असल्याचं म्हटलं होतं. त्यावर करण जोहरच्या टिप्पणीने नेटकऱ्यांना नाराज केलं होतं. त्यावेळी एका सामान्य युजरने केलेलं ट्विट क्रितीच्या आईने रि-ट्विट केलं होतं.

Kriti Sanon : राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या क्रिती सनॉनच्या आईने आलिया भट्टला फटकारलं
Kriti Sanon with parents
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2023 | 6:42 PM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : फिल्म इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही अभिनेत्री क्रिती सनॉनने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावून हे सिद्ध केलं की जिद्द आणि मेहनत केल्यास सर्वकाही सिद्ध होऊ शकतं. ‘मिमी’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र यादरम्यान क्रितीच्या आईची एक जुनी पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक असं ट्विट रि-ट्विट केलं होतं, ज्यामध्ये आलिया भट्टसारख्या अभिनेत्रीला फटकारण्यात आलं होतं.

एकीकडे ‘मिमी’साठी क्रितीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला, तर दुसरीकडे अभिनेत्री आलिया भट्टलाही ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल होणारी क्रितीच्या आईची पोस्ट ही तेव्हाची आहे, जेव्हा क्रितीने तिच्या पहिल्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातील सहकलाकार टायगर श्रॉफसोबत ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली होती. या शोनंतर काही नेटकऱ्यांनी करण जोहरवर टीका केली होती. क्रितीचा अपमान केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी त्यावेळी केला होता.

कॉफी विथ करणमधील क्रितीच्या या एपिसोडनंतर एका युजरने ट्विट करत लिहिलं होतं, ‘मी सोनम कपूरशी सहमत आहे की क्रिती सनॉनला कमी लेखण्यात आलं. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर आलिया भट्टने ‘मिमी’ हा चित्रपट केला असता, तर तिला जास्त श्रेय मिळालं असतं. क्रितीने खरंच खूप चांगलं काम केलंय. एका बुद्धिमान व्यक्तीने एकदा म्हटलं होतं की जर आऊटसाइडर चांगलं काम करत असेल तर त्याच्या यशाला दाबलं जातं. पण तेच जर इनसाइडरने चांगली कामगिरी केली, तर त्याचा जल्लोष केला जातो.’ हे ट्विट एका सामान्य सोशल मीडिया युजरकडून करण्यात आलं होतं. मात्र जेव्हा क्रिती सनॉनची आई गीता सनॉन यांनी ते रि-ट्विट केलं, तेव्हा सर्वांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं होतं.