AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट सामना सुरू असताना टीव्ही स्क्रिनवर धावा कोण अपडेट करतं? किती पगार मिळतो? जाणून घ्या

क्रिकेटच्या प्रत्येक अपडेट आपल्याला झटपट मिळत असतात. मग ते टीव्ही स्क्रिनवर असो की वेब पोर्टलवर.. हे अपडेट प्रत्येक चेंडूनंतर झटपट अपडेट होतात. कसे आणि कोण करते ते जाणून घ्या.

क्रिकेट सामना सुरू असताना टीव्ही स्क्रिनवर धावा कोण अपडेट करतं? किती पगार मिळतो? जाणून घ्या
क्रिकेट सामना सुरू असताना टीव्ही स्क्रिनवर धावा कोण अपडेट करतं? किती पगार मिळतो? जाणून घ्याImage Credit source: Twitter/video grab
| Updated on: Dec 26, 2025 | 7:58 PM
Share

भारतात क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. हा खेळ पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. पण प्रत्येक सामना मैदानात जाऊन पाहणं काही शक्य होत नाही. त्यामुळे टीव्ही, मोबाईल, रेडिओ आणि इतर प्लॅटफॉर्मवर अपडेट मिळत असतात. पण बहुतांश घरात टीव्हीवर आणि प्रवासात मोबाईल एपवर सामने पाहीले जातात. सामना पाहत असताना प्रत्येक अपडेट त्या स्क्रिनवर अपडेट होत असते. खेळाडूने धाव घेतली, विकेट पडली, किती चेंडू टाकले याचे प्रत्येक अपडेत त्या त्या वेळीच मिळत असतात. एका क्षणाचाही विलंब होत नाही. इकडे धाव घेतली की तिथे अपडेट पाहायला मिळते. त्यामुळे इतक्या झटपट अपडेट कोण करतं? त्याची प्रक्रिया काय आहे? चला तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात..

स्कोअर कोण अपडेट करते?

क्रिकेट स्पर्धांमध्ये धावा अपडेट करण्याची एक पद्धत ठरलेली आहे. मग आयपीएल असो की आंतरराष्ट्रीय सामने प्रत्येक ठिकाणी धावा आणि इतर गोष्टी अपडेट करण्याची सारखीच पद्धत आहे. सामन्यातील प्रत्येक धाव ही मॅन्युअली अपडेट करावी लागते. ही जबाबदारी ज्या व्यक्तींवर असते त्यांना स्कोरर असं संबोधलं जातं. त्याच्या एक सिस्टम असते आणि ती सिस्टम ब्रॉडकास्टिंगला कनेक्ट असते. त्यामुळे प्रत्येक अपडेट लाईव्ह होत असते. इथे क्लिक केलं की तिथे अपडेट होतं. मग गोलंदाज कोण होता? वाइड नो बॉल सर्व अपडेट केले जातात. स्ट्राईकला कोण होतं. त्या चेंडूवर त्याने किती धावा काढल्या. कुठे शॉट मारला आणि धावा काढल्या याचे बारीकसारीक अपडेट केले जातात. प्रत्येक अपडेट नंतर रेकॉर्ड हा ऑटोमॅटिक अपडेट होत असतो. तसं कोडिंगच असल्याने ते अपडेट होत जातं.

स्कोररला किती पगार मिळतो?

स्कोररचा पगार हा त्याच्या अनुभवावर अवलंबून असतो. ग्राफिक्स टीममधील सर्वात ज्युनिअर व्यक्तीला स्कोरर संबोधलं जातं. त्याचा पगार इतरांच्या तुलनेत कमी असतो. स्कोररचा पगार 25 ते 30 हजारापासून सुरू होतो. जसा अनुभव वाढतो तशी पगारात वाढ होते. पण हे काम करताना खूप लक्ष ठेवावं लागतं. कारण एक चूक झाली तर चुकीचा मेसेज पोहोचू शकतो. त्यामुळे डोळ्यात तेल घालून बघावं लागतं. कोणत्या बाजूला मारला आणि त्या बाजूला काय म्हणतात हे सर्व लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे जितका अनुभवा तितका पगार वाढत जातो.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...