LOVE STORY | 12 वर्ष लहान पुरुषावर अभिनेत्रीचा जडला जीव, वन नाईट स्टँडनतंर सुरु झाली लव्हस्टोरी

LOVE STORY | आयुष्यात १२ वर्ष लहान पुरुषाची एन्ट्री झाल्यानंतर अभिनेत्रीने पतीला दिला घटस्फोट, अभिनेत्रीने स्वतः सांगितली वन नाईट स्टँडनतंर सुरु झालीले लव्हस्टोरी... आज अभिनेत्री प्रियकरासोबत जगतेय आनंदी आयुष्य... सध्या सर्वत्र अभिनेत्री खासगी आयुष्याची चर्चा सुरु...

LOVE STORY | 12 वर्ष लहान पुरुषावर अभिनेत्रीचा जडला जीव, वन नाईट स्टँडनतंर सुरु झाली लव्हस्टोरी
| Updated on: Sep 27, 2023 | 3:58 PM

मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये कोणाचं नाव कधी कोणसोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं नातं लग्नानंतर फार काळ टिकलं नाही, तर काहींच्या नात्यात अनेक अडचणी आल्या. अखेर अनेक सेलिब्रिटींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर काही सेलिब्रिटी पती / पत्नी सोबत आनंदी नसल्यामुळे त्यांनी नातं संपवण्याचा निर्णय घेतला. तर काही सेलिब्रिटींच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली. बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री अशी आहे, जीचं १२ वर्ष लहान अभिनेत्यावर जीव जडला. एवढंच नाही तर, दोघे लग्न करून आज आनंदी आयुष्य जगत आहेत.

झगमगत्या विश्वातील एक अशी लव्हस्टोरी आहे, जी वन नाईट स्टँडनतंर सुरु झाली. विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) आणि अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmira Shah) यांची लव्हस्टोरी देखील अत्यंत खास आहे. कश्मीरा आणि कृष्णा यांनी त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल आणि वन नाईट स्टँडबद्दल सर्वांना सांगितलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली.

कश्मीरा एका मुलाखतीत म्हणाली, ‘आमच्या नात्याची सुरुवात वन नाईट स्टँडने झाली होती.’ यावर कृष्णा म्हणाला, ‘प्रत्येकाच्या लव्हस्टोरी सुरुवात अशीच होते. फक्त लोक त्याला मान्य करत नाहीत. पण त्या दिवसानंतर कश्मीरा माझी अधिक काळजी करु लागली. ती माझ्यासाठी जेवणाचा डब्बा देखील आणू लागली होती.’

नात्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल अभिनेता म्हणाला, ‘आम्ही कारमध्ये बसलो होतो आणि लाईट गेली. तेव्हा मी म्हणालो काय करायचं…’ त्या दिवसानंतर कश्मीरा आणि कृष्णा यांच्यामध्ये प्रेम बहरलं आहे. त्या दिवसानंतर कोणत्याही गोष्टीचा तमा न बाळगता कृष्णा आणि कश्मीरा यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या नात्याला अधिक महत्त्व दिलं.

कृष्णा याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना अभिनेत्री विवाहित होती. पण पतीसोबत अभिनेत्रीचे संबंध चांगले नव्हते. पण कश्मीराच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ – उतार येत होते. म्हणून अभिनेत्री घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कृष्णा प्रचंड आनंदी झाला. कश्मीरा कृष्णापेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे.

घटस्फोटानंतर कृष्णा आणि कश्मीरा यांनी लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. आज दोघही त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. कश्मीरा कायम सोशल मीडियावर पती आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.