यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर

यावर्षीचा प्रतिष्ठित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी आणि अनेक कलाकारांनाही या वर्षी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्यातील दिग्गजांना दिला जातो, आणि लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. मंगेशकर कुटुंबाने परिपत्रकाद्वारे ही घोषणा केली.

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर
Kumar Mangalam Birla Wins Prestigious Lata Dinanath Mangeshkar Award
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 16, 2025 | 3:29 PM

यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार’ जाहिर करण्यात आला आहे. यंदाचा यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना घोषित करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी परिपत्रकाच्या माध्यमातून पुरस्कारांची घोषणा केली आहे.दरम्यान कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आसा आहे.

यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार’ कोणाला? 

दीनानाथ मंगेशकर यांचा 83 वा स्मृतिदिन मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात 24 एप्रिल रोजी कृपा, कृतज्ञता आणि भव्यतेने साजरा केला जाणार आहे. दरम्यान, मंगेशकर कुटुंब गेल्या 34 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.

तर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ‘लता दीनानाथ मंगेशकर’हा पुरस्कार त्यांच्या स्मरणार्थ दिला जातो. या पुरस्काराचे पहिली मानकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठरले होते. त्यानंतर हा पुरस्कार आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. तर तिसऱ्या वर्षी महानायक अमिताभ बच्चन यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील बड्या उद्योगपतींपैकी एक 

कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील बड्या उद्योगपतींपैकी एक आहेत. आदित्य बिर्ला समूहाचे चौथ्या पिढीचे ते प्रमुख आहेत. वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी 1995 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली होती. त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. तर, श्रद्धा कपूरला भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रभावी योगदानाबद्दल सन्मानित केले जाणार आहे. सोनाली कुलकर्णी यांना नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सम्मानित करण्यात येणार आहे.

मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांना पुरस्कार जाहीर

हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेते सुनील शेट्टी यांनाही दीनानाथ पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. त्याचसोबत भारतीय संगीताच्या क्षेत्रात उदयास येणारे नाव, रीवा राठोडलाही यावेळी पुरस्कृत करण्यात येणार आहे. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांच्यासह शास्त्रीय संगीताच्या जगातील दोन प्रतिष्ठित महिलांनाही या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. दिग्गज व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. एन. राजम यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.

मंगेशकर कुटुंबीयांनी यंदा पत्रकार परिषद न घेता परिपत्रकाच्या माध्यमातून घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ रुग्णालयाचा वाद सुरू असल्यानं मंगेशकर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद न घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.