सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप कंफर्म, आता ‘या’ अभिनेत्री प्रेमात 61 वर्षीय ललित मोदी, ‘तो’ खासगी व्हिडीओ व्हायरल

Sushmita Sen and Lalit Modi Breakup: सुष्मिता सेन आणि ललीत मोदी यांचं ब्रेकअप कंफर्म... 'या' अभिनेत्री प्रेमात 61 वर्षीय ललित मोदी, स्वतःच 'तो' खासगी व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला..., सध्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओची चर्चा...

सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप कंफर्म, आता या अभिनेत्री प्रेमात 61 वर्षीय ललित मोदी, तो खासगी व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Feb 15, 2025 | 3:37 PM

Sushmita Sen and Lalit Modi Breakup: उद्योजक ललित मोदी याने काही वर्षांपूर्वी सुष्मिता सेन हिच्यासोबत असलेल्या नात्यची कबुली दिली होती. ललित याने सुष्मितासोबत खासगी फोटो देखील पोस्ट केले होते. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. दोघांचे फोटो समोर आल्यानंतर सुष्मिता हिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं. ‘गोल्ड डिगर’ आणि ‘लालची बाई…’ असे अनेक टॅग अभिनेत्रीला देण्यात आले. दरम्यान, सुष्मिता सेन हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ललित मोदी याच्या आयुष्यात आणखी एका महिलेची एन्ट्री झाली आहे. खुद्द ललित याने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र ललित मोदी याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, 61 वर्षीय ललित मोदी याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ललित याच्यासोबत एक अभिनेत्री देखील दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करून ललितने त्याचं प्रेम व्यक्त केलं. ललितनं लिहिलं- ‘एकदा भाग्यवान… पण मी दोनदा भाग्यवान ठरलो. जेव्हा 25 वर्षांची मैत्री प्रेमात बदलते. असे दोनदा झाले. आशा आहे की प्रत्येकासाठी असेच असेल. तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

या व्हिडिओसोबत ललितने त्या महिलेचं नाव उघड केलं नाही किंवा इतर कोणतीही माहिती दिली नाही. पण हा व्हॅलेंटाईन डे ललित मोदसाठी नक्कीच खास होता हे निश्चित. व्हिडिओमध्ये ललितने या महिलेसोबत घालवलेल्या खास क्षणांचा फोटो आहे, जो त्याने व्हिडिओ बनवून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

2022 मध्ये सुष्मितासोबत असलेल्या नात्याचा खुलासा…

ललित मोदी याने 2022 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत काही खासगी फोटो पोस्ट करत नात्याची कबुली दिली. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. फोटो पोस्ट करत ललित याने कॅप्शनमध्ये, ‘जागतिक दौऱ्यानंतर. मालदीव सार्डिनिया कुटुंबासह आणि माझी बेटर हाफ सुष्मिता सेनसह. नवीन सुरुवात, नवीन जीवनासाठी खूप आनंद झाला.’ असं लिहिलं होतं.

 

 

सुष्मिताने केलाय टीकेचा सामना

ललितने फोटो शेअर करताच अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात आलं. लोकांनी अभिनेत्रीला ‘गोल्ड डिगर’ असा टॅगही दिला. यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली. तसेच, एका मुळाकतीत अभिनेत्रीने ललित मोदीसोबतच्या नातेसंबंधाबद्दल सांगितल होतं की, हा आणखी एक टप्पा आहे. दोघांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते.