Prajakta Mali And Lalit Prabhakar: 13 वर्षांनंतर जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’, नवीन सिनेमातील क्लायमॅक्स सीन लीक

Prajakta Mali Lalit Prabhakar Movie: ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळीचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या संदर्भातील एक क्लिप व्हायरल झाल्याचे म्हटले जात आहे.

Prajakta Mali And Lalit Prabhakar: 13 वर्षांनंतर जुळणार ललित-प्राजक्ताची रेशीमगाठ, नवीन सिनेमातील क्लायमॅक्स सीन लीक
| Updated on: Nov 11, 2026 | 12:58 PM

Prajakata Mali And Lalit Prabhakar New Movie: मराठी टेलिव्हिजनची लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून ही जोडी घराघरांत पोहोचली आणि लोकांना आवडलीही. मालिकेतील आदित्य आणि मेघना या त्यांच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही या जोडीची चर्चा होत असते. ललित आणि प्राजक्ता यांनी पुन्हा एकत्र काम करावं, अशी चाहत्यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण लवकरच होणार आहे. तब्बल १३ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटांत एकत्र झळकणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांचे नाव शुभ मंगलम जोडी दंगलम असं नाव आहे.

ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांच्या शुभ मंगलम जोडी दंगलम या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. यानंतर या चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये भलतीच उत्सुकता निर्माण झाली. आता या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहे. राजस्थानमधील पुष्कर येथे चित्रित करण्यात आलेल्या एका सीनचा व्हिडिओ असल्याचे समजत आहे.

Loading...

लीक झालेला व्हिडिओमध्ये राजस्थानमधील एका रस्त्यावर चित्रपटाची संपूर्ण टीम शूटिंग करताना दिसत आहे. एका दुकानाबाहेर ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी उभे असल्याचे पाहायला मिळते. यानंतर अचानक ललित एका चोराच्या मागे धावताना दिसत आहे. तो त्या चोराला पकडतो असा सीन पाहून हिरोईनला तो वाचवण्यासाठी धावत असल्याचे समजत आहे. मात्र, या सीनमागचं नेमकं कथानक अद्याप समोर आलेले नाही. काही दिवसांआधी प्राजक्ताने पुष्करला फिरायला गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. 

 नुकताच ललित प्रभाकरचा प्रहार चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात त्यानं कसाबची भूमिका साकारलेली. त्याच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याच्या कसाब या पात्राचे सर्वांनी कौतुक केले. ललितला अशा भूमिकेत पाहणं चाहत्यांसाठी आश्चर्यचकित होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us