AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंत कुटुंबियाची पहिली पसंती या महिलेला, महिन्याला कमावते पाण्यासारखा पैसा

श्रीमंत कुटुंबाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. पण श्रीमंत कुटुंबियांच्या पसंतीची एक अशी महिला आहे, जिने त्यांची मोठी मदत केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही महिला महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करते. जाणून घ्या कोण आहे 'ती'?

श्रीमंत कुटुंबियाची पहिली पसंती या महिलेला, महिन्याला कमावते पाण्यासारखा पैसा
Lalita Dsilva
| Updated on: Jul 22, 2026 | 2:21 PM
Share

झगमगत्या विश्वात एक अशी महिला आहे, जी प्रत्येक श्रीमंत कुटुंबियांच्या पसंतीस उतरते. बॉलिवूड आणि साऊथ सिनेविश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी या महिलेला प्राधान्य देतात, महिलेचं नाव आहे ललिता डिसिल्वा… ललिता डिसिल्व्हा कायम चर्चेत असतात. ललिता डि’सिल्वा यांनी सैफ अली खान – करीना कपूर यांची मुलं तैमूर आणि जेह यांचा सांभाळ केला. एवढंच नाही तर राम चरण आणि उपासना कोनिडेल यांची मुलगी क्लिन कारा हिला देखील ललिता डि’सिल्वा यांनी सांभाळं आहे. ललिता डि’सिल्वा यांनी अनेक सेलिब्रिटींच्या मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलं आहे. एवढंच नाही तर, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंतर अंबानी यांचा देखील ललिता डि’सिल्वा यांनी अनेक वर्ष सांभाळ केला.

कोण आहेत ललिता डि’सिल्वा?

ललिता डिसिल्व्हा एक अनुभवी पीडियाट्रिक आणि प्रोफेशलन केयरगिव्हर आहे… त्यांनी त्यांच्या करीयरची सुरुवात मुंबईतील एका खासगी रुग्णालयातून नर्स म्हणून केली. त्यानंतर त्यांनी सेलिब्रिटींच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सांभाळली… गेल्या अनेक वर्षांपासून ललिता डि’सिल्वा उद्योजक आणि सेलिब्रिटींच्या मुलांचा सांभाळ करत आहेत.

अंबानी कुटुंबियांसोबत कसं जोडलं गेलं नाव?

रिपोर्ट्सनुसार, 1996 मध्ये ललिता डि’सिल्वा यांच्याकडे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांची जबाबदारी देण्यात आली. ललिता डिसिल्व्हा यांनी जवळपास 11 ते 12 वर्ष अनंत यांचा सांभाळ केला.. आज देखील त्यांचे अंबानी कुटुंबियांसोबत चांगले संबंध आहे. अनंत यांच्या वाढदिवशी त्या कायम त्यांच्या लहानपणीचे फोटो पोस्ट करतात. एवढंच नाही तर, अनंत यांच्या लग्नात देखील ललिता डि’सिल्वा उपस्थित होत्या.

तैमूर आणि जेह यांचा देखील केलाय सांभाळ

करीना कपूर आणि सैफ अली खान यांची मुलं तैमून आणि जेह यांच्यासोबत ललिता डि’सिल्वा यांनी स्पॉट केलं जातं. दोघांसोबत ललिता डिसिल्व्हा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

राम चरण आणि उपासना यांच्या मुलीची जबाबदारी डिसिल्व्हा यांच्या खांद्यावर…

ललिता डिसिल्व्हा सध्या राम चरण आणि उपासना यांच्या मुलीचा सांभाळ करत आहे. त्यांनी एक मुलाखतीत अभिनेत्याच्या कुटुंबियांचं कौतुक करत सांगितलं, ‘या कुटुंबाची प्रत्येक गोष्ट चांगली आहे. जर मला आराम करायचा असेल तर उपासना मॅडम स्वतः मुलीचा सांभाळ कतात. आता मी येथे आहे आणि ते लंडन येथे आहेत. त्यामुळे रामचरण आणि उपासना त्यांच्या मुलीची काळजी घेत आहेत… ‘

खरंच त्यांना मिळतं लाखो रुपयं मानधन?

अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ललिता डिसिल्व्हा प्रत्येक महिन्याला 1.5 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. सांगायचं झालं तर, अनुभवी केअरगिव्हर्स अधिक मानधन घेतात, हे त्यांनी मान्य केलं; कारण या कामात चोवीस तास उपलब्ध राहावं लागतं, सततची जबाबदारी पेलावी लागते आणि स्वतःसाठी जवळपास अजिबात वेळ मिळत नाही. अनेक दशके विविध कुटुंबांसोबत काम केल्यानंतर, ललिता डिसिल्व्हा यांनी आता आपल्या अनुभवाचा उपयोग करून स्वतःची ‘केअरगिव्हिंग एजन्सी’ सुरू केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...