Prahaar Box Office Collection : सलग चौथ्या दिवशी प्रहार बॉक्स ऑफिसवर कोसळला, आदिनाथ कोठारेचा नयी नवेली कमाईत आघाडीवर
सध्या बॉक्स ऑफिसवर ललित प्रभाकर याचा प्रहार आणि आदिनाथ कोठारे याचा नयी नवेली सिनेमा हा चर्चेत आहे. सुरूवातील ललितच्या प्रहारने भरगोस कमाई केली, पण आता चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आदळला आहे. तर आदिनाथ कोठारे याचा नयी नवेली याने कलेक्शनमध्ये आघाडी घेतली आहे.

राजकुमार राव आणि ललित प्रभाकरचा प्रहार : द उज्वल निकम स्टोरी ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईसाठी संघर्ष करताना दिसतोय. पहिल्या वीकेंडला कमाईत हळूहळू वाढ झाली खरी पण दुसरा आठवडा सुरू होताच कमाईचा टप्पा धाडकन कोसळला आहे. त्यातल्या त्यात चार दिवसांत चित्रपटाने जगभरात 15 कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे.
प्रहारने पहिल्या दिवशी म्हणजेच 16 ऑक्टोबरला भारतात 2.35 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी कमाई वाढून 3.15 कोटी रूपयांवर पोहोचली. रविवारीही चित्रपटाने चांगली वाढ नोंदवत 3.65 कोटी रूपये कमावले. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांत भारतातील निव्वळ कमाई 9.15 कोटी रूपये झाली होती.
मात्र सोमवारी चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाली. या दिवशी ‘ प्रहार ‘ ने भारतात सुमारे 2 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली. रविवारी झालेल्या कमाईच्या तुलनेत ही घट जवळपास 45 टक्के आहे. त्यामुळे वीकेंडमुळे चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पहिला मोठा धक्का बसल्याचं दिसतं आहे.
जगभरातील कमाई 15.41 कोटी
चार दिवसांच्या कमाईचा विचार केला, तर ‘प्रहारने’ भारतात आतापर्यंत 11.15 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केली आहे. भारतातील एकूण कमाई 13.26 कोटी रूपये झाली असून परदेशातील 2.15 कोटी रूपयांची कमाई धरून जगभरातील एकूण कमाई 15.41 कोटी रूपयांवर पोहोचली आहे.
या चित्रपटात राजकुमार राव यांनी सरकारी वकील उज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे.त्यांच्यासोबत ललित प्रभाकर
वामिका गब्बी, जयदीप अहवालत हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत. अविनाश अरूण यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. उज्वल निकम यांच्या कारकिर्दीतील या सर्वात
महत्त्वाच्या खटल्यावर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला आहे.
‘नयी नवेली’ शी स्पर्धा
दुसरीकडे यामी गौतमच्या नयी नवेली या चित्रपटाचीही बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरू आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाने भारतात 2.50 कोटी रूपयांची निव्वळ कमाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत ‘नयी नवेली’ ने प्रहार पेक्षा आघाडी कायम ठेवली आहे.
पहिल्या वीकेंडला वाढलेली कमाई सोमवारी टिकवता आली नाही. त्यामुळे प्रहार साठी पुढचे दिवस महत्त्वाचे असणार आहेत. चित्रपटाची कमाई पुन्हा वाढते की ती आणखी घसरते यावर त्याच्या बॉक्स ऑफिसवरील पुढील वाटचालीचं चित्र स्पष्ट होईल.