Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर 5 राउंड फायरिंग… कुख्यात गुंडनं स्वीकारली जबाबदारी… पोस्ट पाहून भरेल धडकी

Rohit Shetty Residence Firing: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार... बॉलिवूडमध्ये दहशतीचं वातावरण... कोणत्या कुख्यात गुंडनं स्वीकारली जबाबदारी, त्याची पोस्ट वाचल्यानंतर तुम्हालाही भरेल धडकी

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर 5 राउंड फायरिंग...  कुख्यात गुंडनं स्वीकारली जबाबदारी... पोस्ट पाहून भरेल धडकी
Rohit Shetty Residence Firing
| Updated on: Feb 01, 2026 | 1:49 PM

Rohit Shetty Residence Firing: मुंबई मधील जुहू या भागात राहणारा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर शनिवारी मध्यरात्री फायरिंग करण्यात आली. या गोळीबाराची जबाबदारी आता कुख्यात गुंडानं स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत गुंडानं जबाबदारी स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याने स्वीकारली आहे. शुभम लोंकर आरजू बिश्नोई नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट

शुभम लोंकर आरजू बिश्नोई याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘राम राम जय बजरंग बली सर्व भावांना.. आज मुंबईमध्ये (शेट्टी टॉवर) सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार झाला, त्याची जबाबदारी शुभम लोंकर आरजू बिश्नोई आणि हरी बॉक्सर हरमन संधू घेत आहे. आम्ही त्याला (रोहित शेट्टी) अनेकदा मेसेज केला की, आमच्या कामामध्ये येवू नकोस… पण त्याला कळलं नाही… आता त्याला हे कळंल नाही तर, पुढे त्याच्या घरावर नाही तर, बेडरुममध्ये गोळीबार करु… ही संपूर्ण बॉलिवूडला चेतावनी आहे…’

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर बाईकने जुहू परिसरात आलेला. त्याने रोहित याच्या घराच्या काही अंतारावर बाईक उभी केली होती आणि पायी चालत शेट्टी टॉवरपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर संशयिताने इमारतीच्या दिशेने अनेक पाच राउंड फायरिंग केलं. या घटनेनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु या दाव्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे हाती आलेले नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे. घडलेल्या घटनेनंतर रोहित शेट्टी याच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

रोहित शेट्टी याच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी अभिनेता सलमान खान याच्या घरावर देखील बिश्नोई गँगने गोळीबार केला होता. घडलेल्या घटनेनंतर, गुन्हे शाखा या दृष्टिकोनातून दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत. घटनेनंतर शेट्टी टॉवरबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चालत असताना गोळीबार करताना दिसत आहे.