Laxmikant Berde: त्याच्या नादाला लागलो अन्…बॉलिवूड सुपरस्टारमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना खावा लागलेला मार

Laxmikant Berde Old Interview: मराठी दिग्गज अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जुना मुलाखतीत एक किस्सा बोलून दाखवला होता. ज्यात त्यांनी सांगितले की त्यांना बॉलिवूड अभिनेत्यामुळे मार खावा लागला होता.

Laxmikant Berde: त्याच्या नादाला लागलो अन्...बॉलिवूड सुपरस्टारमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना खावा लागलेला मार
| Updated on: Nov 02, 2026 | 1:56 PM

Laxmikant Berde News: आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्या यांच्या निधनानंतरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यांनी साकारलेल्या बहुतेक चित्रपट हे हिटच होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकेने लोकांच्या मनात वेगळी छाप सोडली आहे. चित्रपटांत लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे चित्रपट हा हिटच असणार असं जवळपास समीकरण होते. मराठी सोबत लक्ष्या मामा यांनी हिंदी चित्रपचटातही वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र या लक्ष्या मामा यांना एका बॉलिवूड अभिनेत्यामुळे मार खावा लागला होता. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याबद्दल बोलून दाखवले आहे.

लक्ष्मीकांत यांचा जन्म अतिशय साध्या घरात झाला. त्यात आई -वडील आणि पाच भावंडं एवढा गोतावळा होता. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती. मात्र घरात आनंद भरपूर होता. त्यांच्या आईदेखील लक्ष्मीकांत त्यांच्यासारख्याच खेळकर होत्या. कदाचित आईचाच हा गुण त्यांच्यात उतरला असावा. लहानपणी त्यांना वाटायचं की मोठे झाल्यावर बस कंडक्टर व्हायचं आणि तिकिटांचे पैसे स्वतःकडे ठेवून श्रीमंत व्हायचं. मात्र नंतर कळलं की ते पैसे ऑफिसमध्ये जमा करावे लागतात. तेव्हा त्यांनी तो विचार सोडून दिला. अशाचह एका मुलाखतीत त्यांनी वडिलांचा मार पडल्याचा किस्सा सांगितला होता.

Loading...

लक्ष्मीकांत यांचा जन्म हा अतिशय साध्या घरात झाला आहे. त्यात आई-वडील आणि पाच भावंडे आहेत. लहानपणी त्यांना वाटायचे की ते मोठे झाल्यावर बस कंडक्टर बनतील, तिकिटींचे पैसे स्वत: कडे ठेवून श्रीमंत होतील, मात्र नंतर कळलं की ते पैसे ऑफिसमध्ये जमा करावे लागतात, तेव्हा मात्र त्यांनी हा विचार लगेचच सोडून दिला. त्याकाळात बॉलिवूडमध्ये हिरो जे करायचे तेच करायची स्टाईल होती.  अनेक तरुण हिरोंची स्टाईल फॉलो करायचे. त्यात तेव्हा जितेंद्र यांची जास्त क्रेझ होती. एका चित्रपटात जिंतेद्र यांनी घट्ट पॅन्ट घातली नंतर तीच त्यांची स्टाईल झाली होती. टाइट पॅन्ट त्याकाळात खूप महाग मिळायची. त्यामुळे मी वडिलांचा खूप मार खाल्ला होता. यामुळे मी जिंतेद्रमुळे मार खाल्ला असं ते म्हणाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us