
पवित्र रिश्ता मालिकेतून चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 38 व्या वर्षी तिचे निधन झाले. दोन वर्षांपासून प्रिया ही कर्करोगाची झुंज देत होती. शेवटी पहाटे तिचे निधन झाले. दोन वर्षांपूर्वीच प्रियाने आरोग्याचे कारण देत मालिकेला रामराम केले होता. मात्र, प्रिया मराठे हिच्या कर्करोगाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी कळाल्यावर लोकांना सुरूवातीला विश्वासच बसला नाही. मात्र, त्यानंतर अनेक कलाकारांनी प्रियासाठी पोस्ट शेअर केल्या.
प्रिया मराठे हिने शंतनू मोघे याच्यासोबत लव्ह मॅरेज केले होते. दोघांची लव्ह स्टोरी अत्यंत खास होती. विशेष म्हणजे प्रिया हिला जेव्हा कर्करोग झाला, त्यावेळेपासून ते शेवटपर्यंत प्रियासोबत पती शंतनू मोघे हा उभा होता. तिचे प्रत्येक काम शंतनू याने केले. यासोबचत आता प्रिया मराठे हिच्याबद्दल एक मोठी माहिती पुढे येतंय. यावरून हे स्पष्ट समजते की, प्रिया आणि शंतनू हे दोघे एकमेकांवर किती जास्त प्रेम करत होते.
प्रिया मराठे ही ज्यावेळी मालिकांच्या सेटवर असायची त्यावेळी कितीही कमी ब्रेक मिळाला तरीही ती पती शंतनू मोघे याला फोन करत. दोघांमध्ये सतत व्हिडीओ कॉल सुरू राहत. प्रिया मराठे हिच्यासोबत काम करणाऱ्यांनी सांगितले की, प्रिया आणि शंतनू मोघे यांच्यात खूप जास्त प्रेम होते. प्रियाला शूटिंगमधून थोडाही वेळ मिळाला की, ती लगेचच शंतनूला फोन करत आणि दोघे गप्पा मारत. हेच नाही तर कर्करोगामध्येही प्रियाची प्रत्येक सेवा शंतनूने केली आहे.
शंतनू मोघे हा प्रियाला जान म्हणून आवाज देत. प्रियाच्या निधनामुळे पती शंतनू मोघे याला मोठा धक्का बसला आहे. प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रध्दाजंली वाहिल्या आहेत. प्रिया मराठे ही सोशल मीडियावर कायमच पतीसाठी खास पोस्ट शेअर करताना दिसत.