माधुरीचा फ्लॉप चित्रपट, सुपरस्टार देखील झाला फेल, 3 वेळा रडले दिग्दर्शक, माधुरीवर झालेला आरोप

90 च्या दशकातील माधुरीचा फ्लॉप चित्रपट, ज्यामुळे 3 वेळा रडले दिग्दर्शक, माधुरी दीक्षितवर झालेला आरोप. नेमकं काय होतं कारण?

माधुरीचा फ्लॉप चित्रपट, सुपरस्टार देखील झाला फेल, 3 वेळा रडले दिग्दर्शक, माधुरीवर झालेला आरोप
| Updated on: May 17, 2026 | 2:51 PM

बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता की अभिनेत्री माधुरी दीक्षितचे नावच चित्रपट हिट होण्यासाठी पुरेसे मानले जात होते. 90 च्या दशकात तिचे स्टारडम शिखरावर होते. ‘तेजाब’, Hum Aapke Hain Koun..!, Saajan यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मोठमोठे निर्माते-दिग्दर्शक तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. मात्र एका चित्रपटाच्या अपयशाने प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांना मोठा धक्का बसला होता.

1997 साली प्रदर्शित झालेला ‘कोयला’ हा चित्रपट राकेश रोशन यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितची जोडी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर झळकली होती. चित्रपटावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता आणि तो बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करेल, अशी अपेक्षा होती.

मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ‘कोयला’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही आणि तो अपेक्षेपेक्षा कमी यशस्वी ठरला. या अपयशामुळे राकेश रोशन यांना आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा फटका बसल्याचे सांगितले जाते.

ऋतिक रोशनने सांगितला वडिलांचा भावनिक क्षण

राकेश रोशन यांचा मुलगा आणि अभिनेता हृतिक रोशनने एका मुलाखतीत ‘कोयला’च्या अपयशानंतर वडिलांची अवस्था कशी झाली होती, याबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले की, या चित्रपटात मोठी गुंतवणूक करण्यात आली होती आणि चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही.

ऋतिकच्या मते, या अपयशानंतर राकेश रोशन खूप भावूक झाले होते. त्यांनी आयुष्यभराची कमाई चित्रपटात गुंतवली होती. काही आर्थिक व्यवहारांमध्येही नुकसान झाल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. ऋतिकने सांगितले की, वडिलांच्या डोळ्यांत अश्रू आले होते आणि हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता.

माधुरी दीक्षितवर साधला होता निशाणा?

माध्यमांतील काही रिपोर्टनुसार, राकेश रोशन यांनी ‘कोयला’च्या अपयशासाठी अप्रत्यक्षपणे माधुरी दीक्षितला जबाबदार धरल्याची चर्चा होती. त्यांनी कथितरित्या असे म्हटले होते की, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी माधुरीची प्रतिमा त्या वेळी पुरेशी प्रभावी ठरली नाही. ही टिप्पणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.

मात्र या वक्तव्यामुळे माधुरी दीक्षितच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. विशेष म्हणजे त्याच वर्षी माधुरीला Dil To Pagal Hai या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

Follow Us