AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या सिनेमाचा पाकिस्तानमध्ये धुमाकूळ, थेट नंबर १ला होतोय ट्रेंड

Madhuri Dixit: नेटफ्लिक्सवर पाकिस्तानमध्ये कोणते १० सिनेमे ट्रेंड होत आहेत याची यादी समोर आली आहे. या यादीमध्ये माधुरी दीक्षितचा नवा प्रदर्शित झालेला सिनेमा नंबर वन वर आहे. आता हा सिनेमा कोणता आहे? जाणून घ्या...

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या सिनेमाचा पाकिस्तानमध्ये धुमाकूळ, थेट नंबर १ला होतोय ट्रेंड
Madhuri DixitImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 11, 2026 | 4:35 PM
Share

बॉलिवूड चित्रपटांची क्रेझ ही जगभरात पाहायला मिळते. अनेकदा तर भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि सीमेकडील देशामध्ये तर बॉलिवूड सिनेमांची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. पाकिस्तानमध्ये आज, म्हणजे ११ जून रोजी नेटफ्लिक्सवरील काही सिनेमे ट्रेंड होत असल्याची माहिती समोर आली आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत साइटवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाकिस्तान टॉप १० मध्ये पहिल्या चार क्रमांकावर बॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर तर अभिनेत्री माधुरी दीक्षितचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा आहे.

१. मां बहन:

यादीत पहिल्या क्रमांकावर नुकताच रिलीज झालेला माधुरी दीक्षितचा डार्क कॉमेडी थ्रिलर सिनेमा मां-बहन आहे. या सिनेमामध्ये माधुरी दीक्षितसोबत तृप्ती डिमरी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धारणा दुर्गा, गीतांजली कुलकर्णी आणि रवि किशन यांच्यासह इतर कलाकार आहेत. हा सिनेमा टॉप १० मध्ये येऊन एक आठवडा झाला आहे.

२. कारा:

दुसऱ्या क्रमांकावर तमिळ भाषेतील सिनेमा कारा आहे. या सिनेमामध्ये धनुष मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन विग्नेश राजा यांनी केले आहे. हा सिनेमा दोन आठवड्यांपासून पाकिस्तान टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

३. धुरंधर: द रिवेंज (रॉ अँड अनदेखा):

तिसऱ्या क्रमांकावर रणवीर सिंहचा सिनेमा धुरंधर: द रिवेंज आहे. हा सिनेमा याच वर्षी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. गेल्या चार आठवड्यांपासून हा नेटफ्लिक्स टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

४. कर्तव्य:

चौथ्या क्रमांकावर सैफ अली खानचा सिनेमा कर्तव्य आहे. हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. गेल्या चार आठवड्यांपासून तो टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

५. ऑफिस रोमांस:

पाचव्या क्रमांकावर नुकतीच रिलीज झालेली इंग्लिश फिल्म ऑफिस रोमांस आहे. ही एक रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे. एक आठवड्यापासून ती टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

६. गोट:

सहाव्या क्रमांकावर स्पोर्ट्स कॉमेडी फिल्म गोट आहे. ही एक अॅनिमेटेड फिल्म आहे. तीन आठवड्यांपासून ती पाकिस्तान टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

७. स्वॅप्ड:

सातव्या क्रमांकावर अॅनिमेटेड फँटसी अॅडव्हेंचर कॉमेडी फिल्म स्वैप्ड आहे. गेल्या ६ आठवड्यांपासून ही नेटफ्लिक्स टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

८. मॉर्टल कॉम्बॅट:

आठव्या क्रमांकावर मार्शल आर्ट फिल्म मॉर्टल कॉम्बॅट आहे. तीन आठवड्यांपासून ती पाकिस्तानमध्ये टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

९. लेडीज फर्स्ट:

नवव्या क्रमांकावर अमेरिकन कॉमेडी फिल्म लेडीज फर्स्ट आहे. ही फिल्म याच वर्षी रिलीज झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ती टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

१०. दोज व्हू विश मी डेड:

दहाव्या क्रमांकावर २०२१ मध्ये रिलीज झालेली अॅक्शन थ्रिलर फिल्म दोज व्हू विश मी डेड आहे. ही फिल्म टेलर शेरिडन यांनी दिग्दर्शित केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ती टॉप १० मध्ये ट्रेंड करत आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान