‘महाभारत’ फेम भीम 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत, 29 वर्षीय महिलेसोबत नको ते कृत्य, नेमकं घडलं काय?
Saurav Gurjar: 'महाभारत' मधील भीम वादाच्या भोवऱ्यात, 29 वर्षीय महिलेसोबत नको ते कृत्य... त्रस्त महिलेने घेतली पोलिसांची मदत, अभिनेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नेमकं घडलंय तरी काय?

Saurav Gurjar: ‘महाभारत’ मालिकेत भीम ही भूमिका साकारणारा आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र पार्ट 1’ मध्ये झळकलेला अभिनेता सौरव गुर्जर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेत्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिलेचं लैगिंक शोषण केल्याच्या आरोपाखाली सौरव गुर्जर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, एका 29 वर्षीय महिलेने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप अभिनेत्यावर केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्याला मुंबई विमानतळावरून बेड्या ठोकल्या.
सौरव गुर्जर याच्यावर लैगिंक शोषणाचे आरोप.. .
एएनआयच्या रिपोर्टनुसार, अभिनेता आणि माजी डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) कुस्तीपटू सौरव गुर्जरविरुद्ध एका 29 वर्षीय महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून गचीबोवली पोलिसांनी मुंबई विमानतळावरून सौरवला ताब्यात घेतलं आणि दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. दंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. सौरवने लग्नाचं खोटं आमिष दाखवून आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
Hyderabad, Telangana | Actor and former WWE wrestler Saurav Gurjar was detained by Gachibowli police at Mumbai Airport and produced before a Magistrate, who sent him to 14 days’ judicial remand, following a complaint lodged by a 29-year-old woman, alleging sexual exploitation on a false promise of marriage
— ANI (@ANI) September 20, 2026
सोशल मीडियावर झालेली दोघांची ओळख
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये सौरव आणि महिलेची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर झालेली. त्यानंतर दोघांनी स्वतःचे फोन नंबर एकमेकांना दिले, त्यानंतर व्हाट्सअप दोघांचं बोलणं सुरु झाली. अखेर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. महिलेचे असे आरोप आहेत की, 25 डिसेंबर 2021 सौरव याला प्रत्येक्षात भेटलेली. पहिल्याच भेटीत सौरव यांनी महिलेचा विश्वास संपादन केला आणि लग्न करण्याचं वचन दिलं.
सौरव गुर्जर याचं वर्कफ्रंट
सौरव गुर्जर याने अनेक चर्चित सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. विशेषतः त्यांनी अनेक पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेता ‘महाभारत’, ‘शिव शक्ती- त्याग तांडव’, ‘वीर आंजनेय’ आणि ‘संकटमोचन महाबली हनुमान’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये दिसला आहेत. याशिवाय, अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ सिनेमाचाही भाग राहिला आहे. पण आता अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.