AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॉन्स्टेबल मंजू’ आता झाली ‘इन्स्पेक्टर मंजू’; नव्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

सन मराठी वाहिनीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील कॉन्स्टेबल मंजू आता इन्स्पेक्टर मंजू झाली आहे. मालिकेतील या ट्विस्टविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

'कॉन्स्टेबल मंजू' आता झाली 'इन्स्पेक्टर मंजू'; नव्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
constable manjuImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2025 | 8:08 PM
Share

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ‘सन मराठी’ वाहिनीवरील मंजूला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. आजपासून (29 सप्टेंबर) ‘कॉन्स्टेबल मंजू’चा ‘इन्स्पेक्टर मंजू’ म्हणून नवा प्रवास सुरू होतोय. दररोज रात्री 8 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. प्रेक्षकांचं सत्या- मंजूबरोबर इतकं घट्ट नातं निर्माण झालं आहे की, वयाच्या 84 व्या वर्षी दत्ता कर्णे हे आजोबा मंजूला पाहण्यासाठी थेट सेटवर पोहोचले. प्रेक्षक सत्या- मंजूला कुटुंबातील सदस्य समजून त्यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेतून सत्या- मंजूचा नवा प्रवास उलगडणार असून नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिक उंचीवर नेत आहे.

प्रोमोमध्ये मंजू इन्स्पेक्टरच्या रूपात एण्ट्री घेताना दिसत आहे. तिचा हा डॅशिंग लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. याचसह सत्याचा लूक पूर्णपणे बदलेला दिसून येतोय. या मधल्या काळात सत्या – मंजूच्या नात्यात नक्की काय काय घडलं असेल? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. प्रेक्षकांसाठी मंजूचा नवा प्रवास आणखी रंगतदार आणि मनोरंजक असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

मालिकेच्या नव्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांची लाडकी मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, “मंजू या नावाने मला प्रेक्षकांनी दिलेली ओळख ही माझ्यासाठी खूप आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. कॉन्स्टेबल मंजू ही भूमिका आजही प्रेक्षकांना खरी वाटते. आता या व्यक्तिरेखेचा नवा प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. कॉन्स्टेबलची जबाबदारी पार पडल्यानंतर मंजू आता पुढील प्रशिक्षण घेऊन इन्स्पेक्टर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.”

“मंजूचा आत्मविश्वास, तिची मेहनत आणि प्रगती पाहून प्रेक्षकांना निश्चितच अभिमानाने भरून येईल. तिचं धाडस, चिकाटी आणि न्यायासाठीची लढाई आता अधिक जोमाने दिसणार आहे. मी स्वतःही या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहे. इन्स्पेक्टर मंजू म्हणून अधिक दमदार अ‍ॅक्शन आणि नवीन स्टंट्ससाठी मी पूर्णपणे तयार आहे. हा प्रवास यशस्वी करण्यासाठी प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यापूर्वी तुम्ही आम्हाला जी आपुलकी आणि प्रेम दिलं, ते पुढेही तसंच लाभावं, हीच मनापासून इच्छा. तुमच्या मनोरंजनात कोणतीही कमी आम्ही भासू देणार नाही”, अशा शब्दांत मोनिकाने भावना व्यक्त केल्या आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.