‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये अनपेक्षित वळण; स्वानंदी-समरच्या आयुष्यात काय घडणार?

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेच्या कथानकात दररोज नवनवीन वळणं पहायला मिळत आहेत. समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात आता आणखी एक धक्कादायक वळण येणार आहे. नेमकं काय घडणार, ते जाणून घ्या..

वीण दोघांतली ही तुटेनामध्ये अनपेक्षित वळण; स्वानंदी-समरच्या आयुष्यात काय घडणार?
वीण दोघांतली ही तुटेना, दीपज्योती
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 19, 2026 | 3:58 PM

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये सध्या अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘दीपज्योती’ या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आहेत. या मालिकेच्या कथानकात पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. या मालिकांच्या पुढील एपिसोडमध्ये बरेच ट्विस्ट पहायला मिळणार आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये बाळाच्या विचाराने स्वानंदी सतत तणावात आहे. स्वानंदीला आनंदी ठेवण्यासाठी समर वेगवेगळे प्रयत्न करतोय.

दरम्यान, भाऊबीजेच्या दिवशी अंशुमनला घरी बोलावलं नसल्यामुळे सुष्मिता गोंधळ घालते आणि यासाठी समरला जबाबदार धरते. समर आपल्या कामाच्याबाबतीत अतिशय शिस्तप्रिय असल्यामुळे तो स्वानंदीला ऑफिसमध्ये थांबून प्रेझेंटेशन पूर्ण करण्यास सांगतो. मात्र, काम करत असताना तिची काळजी घेणंही तो विसरत नाही. तिच्यासाठी जेवण आणण्यापासून ते तिची काळजी घेण्यापर्यंत पती म्हणून आपली प्रत्येक जबाबदारी तो पार पडणार आहे. काम संपल्यानंतर दोघंही घरी परतत असताना वाटेत अंशुमनने पाठवलेले गुंड त्यांच्यावर हल्ला करणार आहेत.

Loading...

तर दुसरीकडे ‘दीपज्योती’ मालिकेत ज्योतीच्या आईने दिवाळीच्या जेवणासाठी दीपला घरी बोलावण्यास सांगितलं आहे. आईच्या आग्रहामुळे नाइलाजाने ज्योती दीपला फोन करून घरी येण्याचं आमंत्रण देते. दिवाळीच्या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र जमणार आहेत. मात्र, दीप आणि ज्योती यांच्यातील तणाव आणि अवघडलेपणा स्पष्टपणे जाणवतो. यादरम्यान ज्योतीची आई सर्वांना फोटो काढण्यासाठी एकत्र उभं राहण्यास सांगते. या फोटोत दीप आणि पुरुषोत्तम एकमेकांच्या शेजारी उभे आहेत. ज्योतीच्या आईला तिच्या पश्चात ज्योतीच्या भविष्याचे काय होईल, या विचाराने ती अस्वस्थ आहे. ज्योतीसाठी दीपच योग्य जोडीदार असल्याच तिच्या मनात आहे. त्यामुळे ती ज्योतीकडून दीपशी लग्न करण्याचं वचन मागणार आहे. दुसरीकडे, आत्यादेखील दीप आणि ज्योतीला एकत्र आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतेय. आता ज्योती आपल्या आईच्या इच्छेला मान देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशा अनेक वळणांमुळे झी मराठीच्या मालिकांमधील आगामी भाग प्रेक्षकांसाठी अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us