AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, अचानक बंद पडलं

एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाली आहे.

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, अचानक बंद पडलं
| Updated on: Nov 19, 2026 | 4:29 PM
Share

Eknath Shinde Helicopter Malfunction : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाली आहे. पंढरपूरचा दौरा आटोपून ते मुंबईला निघाले होते. परंतु हेलिकॉप्टर सुरूच झाले नाही. हेलिपॅडवर अचानक हेलिकॉप्टर बंद पडले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. हेलिकॉप्टर बंद पडले तेव्हा कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये कार्यक्रम आटोपून निघाले होते. ते हेलिपॅडवर पोहोचले होते. परंतु हेलिकॉप्टर सुरू झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड झाला. ऐनवेळी हेलिकॉप्टर बंद पडल्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाली. हेलिपॅडवर लगेच पोलीस, सुरक्षा अधिकारी दाखल झाले. सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार ते पंढरपूरहून आता पुण्याला निघाले आहेत. ते पुण्याहून विमान प्रवास सरून मुंबईला जाणार आहेत.

एक इंजिन सुरू झाले, दुसरे इंजिन मात्र…

एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. पायलट हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ते सुरू होत नव्हते. एक इंजिन सुरू झाले होते. परंतु दुसरे इंजिन सुरू होत नव्हते. बॅटरी लो असल्यानेच ही अडचण निर्माण झाली. बॅटरी चार्ज करण्याचा प्रयत्न झाला. परंतु यात यश आले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना साधारण वीस ते 25 मिनिटे वाट पाहावी लागली. त्यानंतर ते कारमधून पुण्याच्या दिशेने निघाले. पुण्याहून आता ते मुंबईला विमानाने जाणार आहेत.

Follow Us
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे