गव्हाच्या पिठात मिसळा ‘हे’ चपाती बनेल प्रोटीनने परिपूर्ण चपाती!
तुमच्या गव्हाच्या पिठात पीठ मळताना काही गोष्टी मिसळल्यास त्यात प्रोटीन ऍड होईल आणि रोजीच साधी चपाती एकदम प्रोटीनने परिपूर्ण अशी चपाती बनेल.

आपल्यात घरात बहुतेक रोजच चपाती बनवतात. गव्हापासून या चपात्या बनवल्या जातात. गव्हाच्या पिठात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, तर प्रोटिनचे प्रमाण कमी असते. मात्र, शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळणे आवश्यक असते नाही तर स्नायू कमकुवत होऊ लागतात. जर तुम्हालाही तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर पिठामध्ये काही बदल करून तुम्ही तुमच्या पोळ्यांना प्रोटीनयुक्त बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या, तुम्ही तुमच्या पोळ्यांमधील प्रोटीनचे प्रमाण कसे वाढवू शकता.
धान्ये आणि कडधान्ये मिसळणे
रोटीमधील प्रोटीनचे प्रमाण वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पिठामध्ये काही धान्ये आणि कडधान्ये मिसळणे. यामुळे केवळ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणच वाढत नाही, तर प्रोटीनची एकूण पातळीही सुधारते.
हरभऱ्याचे पीठ मिसळा
तुम्ही एक किलो गव्हाच्या पिठात २०० ग्रॅम भाजलेल्या हरभऱ्याचे पीठ (सत्तू) मिसळू शकता. यामुळे पोळ्यांची चव सुधारते आणि त्यातील प्रोटिनचे प्रमाणही सहज वाढते.
सोयाबीनचे पीठ
पर्यायी उपाय म्हणून, तुम्ही सोयाबीनचे पीठ वापरू शकता, जे प्रोटिनचा एक उत्तम स्रोत आहे. एक किलो गव्हाच्या पिठात १०० ग्रॅम सोयाबीनचे पीठ मिसळा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही सोयाबीनच्या पिठाचे प्रमाण वाढवू शकता, परंतु ते खूप जास्त प्रमाणात घातल्यास पोळ्या कडक होऊ शकतात.
बेसनचे पीठ
तुमच्या पोळ्यांमधील प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी, तुम्ही गव्हाच्या पिठात हरभरा डाळीचे पीठ अर्थात बेसन किंवा ज्वारी आणि बाजरीसारख्या भरड धान्यांपासून तयार केलेले पीठ मिसळू शकता. यामुळे पिठाचे पौष्टिक मूल्यही वाढते.
