Shivsena Hearing: गुवाहाटीत बसून शिंदे ठरवू शकत नाहीत’ कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा डाव, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जोरदार युक्तीवाद करत पुन्हा एकदा आक्रमकपणे निवडणूक आयोग तसेच शिवसेना शिंदे गटाची कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमध्ये बसून पक्षप्रतोद कोण हे ठरवू शकत नाहीत, असा पलटवार कपील सिब्बल यांनी केला आहे.

Shivsena Party And Symbol Hearing: सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पार पडत आहे. सुप्रीम कोर्टात आज शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा जोरदार युक्तीवाद करत पुन्हा एकदा आक्रमकपणे निवडणूक आयोग तसेच शिवसेना शिंदे गटाची कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमध्ये बसून व्हिप कोण हे ठरवू शकत नाहीत, असा पलटवार कपील सिब्बल यांनी केला आहे.
काय म्हणालेत कपिल सिब्बल?
आजच्या सुनावणीत बोलताना कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रता प्रकरणात रिजॉईंटर करायचं असे म्हटलं आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत असं पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुका होईपर्यंत प्रकरण ऐकले गेले नाही त्यामुळे आम्हाला कोर्टात यावे लागले. विधानसभा अध्यक्षांचे कार्यक्षेत्र काय आहे? असा सवालही यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित करत त्याचा कायदेशीर आढावाही घेतला असं कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत म्हटलं आहे.
“निवडणूक आयोगाने पक्ष कोण आहे हे ठरवले आहे. विधिमंडळातले बहुमत म्हणजेच चिन्ह हे निवडणूक आयोगाने ठरवले आहे. विधानसभा नेता, विधिमंडळ नेता आणि मुख्यमंत्री निवडणे याला आमचा विरोध आहे. गुवाहाटीमध्ये बसून व्हिप कोण असेल हे एकनाथ शिंदे ठरवू शकत नाहीत. गुवाहाटीमध्ये बसून इशारा दिला गेला आणि व्हिप काढला गेला. याप्रकरणात आधी वाद तयार करणे नंतर निवडणूक आयोगात येणे अन् पक्ष ताब्यात घेणे असा क्रम झाला आहे. निवडणूक आयोगाने कोण पक्ष आहे याचा निर्णय दिला ती तारीखही अत्यंत महत्त्वाची आहे. फेब्रुवारी 2023 पासून शिवसेना पक्ष आहे, पण त्याआधीही आम्ही पक्ष होतो ना?” असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
आधी प्लॅन, मग पक्ष ताब्यात घेतला…’
तसेच “विचारधारा वगेरे कारण त्यांच्याकडून दिले गेले मात्र त्याला कोणताही आधार नाही. भरत गोगावले यांची व्हिप म्हणून केलेली नियुक्ती ही चुकीची आहे कारण ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती. यासंदर्भातील तीन याचिका दाखल असताना ही केलेली नियुक्ती चुकीची आहे. हे सर्व विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी घडले, जे आधीच ठरवले होते आणि त्याला भाजपकडून मदत झाली,” असा मोठा दावाही कपिल सिब्बल यांनी केला आहे.
