मलायकाच्या ‘या’ पर्सच्या किंमतीत तुम्ही करू शकता युरोप ट्रिप, पर्स, चप्पल आणि पॅन्टची किंमत लाखोंच्या घरात, थेट..

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. आता अरबाज खान हा पुढे गेला असून त्याने शूरा खान हिच्यासोबत घटस्फोट घेतलाय.

मलायकाच्या या पर्सच्या किंमतीत तुम्ही करू शकता युरोप ट्रिप, पर्स, चप्पल आणि पॅन्टची किंमत लाखोंच्या घरात, थेट..
| Updated on: Mar 13, 2024 | 2:33 PM

मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्याकडे चाहत्यांच्या नेहमीच नजरा बघायला मिळतात. मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका अरोरा ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कूपर याला डेट करतंय. अनेकदा यांचे काही खास फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत माय बाॅय असे म्हटले होते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे फोटो घेताना नेहमीच पापाराझी हे दिसतात. नुकताच आता मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे स्पाॅट झाले. आता यांचे ते खास फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

यावेळी सर्वांच्या नजरा या मलायका अरोरा हिच्या लूककडे दिसल्या. यावेळी मलायका अरोरा ही जबरदस्त लूकमध्ये दिसली. मात्र, मलायका अरोरा हिच्यापेक्षाही तिच्या लूकच्या अधिक चर्चा या रंगताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिने यावेळी जी पर्स घेतली होती, त्या पर्समध्ये युरोपची तुमची ट्रिप देखील होईल. तब्बल लाखोंच्या घरात या पर्सची किंमत आहे.

यावेळी मलायका अरोरा हिने जी ट्राऊजर घातली होती, ती देखील अत्यंत महागडी आहे. या ट्राऊजरची किंमत ही तब्बल 1,94,433 आहे. यावेळी मलायका अरोरा हिने एक सायगॉन मिनी पर्स देखील कॅरी केली. या पर्सची किंमत तब्बल 2,80,887 रुपये आहे. ही पर्स अत्यंत लग्झरी नक्कीच आहे. आता या पर्सची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे.

यावेळी मलायका अरोरा हिने घातलेली फुटवेअर देखील अत्यंत महागडी असून तब्बल 76,784 रुपयांची आहे. आता मलायका अरोरा हिच्या या लूकची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या घटस्फोटाबद्दल मोठे विधान केले होते. यावेळी काही मोठे खुलासे करताना मलायका अरोरा ही दिसली होती. पहिल्यांदाच अरबाजसोबतच्या घटस्फोटावर बोलताना मलायका दिसली.