AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR Eliminator : राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Eliminator Match Result IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

SRH vs RR Eliminator : राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट
Rajasthan Royals Riyan Parag Vaibhav SooryavanshiImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 28, 2026 | 1:53 AM
Share

रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स टीमने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील क्वालिफायर 2 मध्ये (IPL 2026 Qualifier 2) धडक देत ट्रॉफीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या दोघांनी केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादने राजस्थानच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. राजस्थानने हैदराबादला 19.2 ओव्हरमध्ये 196 रन्सवर ऑलआऊट केलं. राजस्थानने यासह क्वालिफायर 2 चं तिकीट मिळवलं. तर हैदराबादचं पराभवासह पॅकअप झालं.

सामन्यात काय झालं?

हैदराबादने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी बोलावलं. राजस्थानने या संधीचा पूर्ण फायदा घेत आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. राजस्थानला इथवर पोहचवण्यात वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. वैभवने फक्त 29 बॉलमध्ये 97 रन्स केल्या. तर ध्रुवने 21 चेंडूत 50 धावांचं योगदान दिलं.

तसेच यशस्वी जैस्वाल याने 29 आणि कॅप्टन रियान पराग याने 26 धावा जोडल्या. डोनोवन फेरेरा आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. हैदराबादकडून प्रुफल हिंगे याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर एशान मलिंगा, शिवांग कुमार आणि नितीश कुमार रेड्डी या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

हैदराबादच फलंदाज ढेर

जोफ्रा आर्चर याने 244 धावांचा पाठलाग करायला आलेल्या सनरायझर्स हैदराबादला डावातील दुसऱ्याच बॉलवर झटका दिला. जोफ्राने अभिषेक शर्मा याला झिरोवर आऊट केलं. तसेच स्टार विस्फोटक फलंदाजही या निर्णायक सामन्यात विक्रमी लक्ष्यासमोर फिके पडले. हैदराबादसाठी एकाही फलंदाजाला अर्धशतक सोडा 40 हा आकडाही गाठता आला नाही.

हेड-क्लासेन अपयशी

हैदराबादसाठी नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 38 धावा केल्या. सलील अरोरा याने 35 तर इशान किशन याने 33 धावा जोडल्या. तसेच शिवांग कुमार याने 27 रन्स केल्या. तर राजस्थानच्या गोलंदाजांनी इतर फलंदाजांना 20 धावांच्या आत रोखून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर ट्रॅव्हिस हेड आणि हेन्रिक क्लासेन हे दोघेही काही करु शकले नाहीत. हेडने 17 आणि क्लासेनने 18 धावा केल्या. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर नांद्रे बर्गर, सुशांत मिश्रा आणि रवींद्र जडेजा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर यश राज पुंजा याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

स्कोअरकार्ड

राजस्थानकडून विजयासह पराभवाची मालिका खंडीत

राजस्थान रॉयल्सने हैदराबादला पराभूत करुन मोठा कारनामा केला आहे. राजस्थानने हैदराबाद विरुद्ध पराभवाची मालिका खंडीत केली आहे. हैदराबादने याआधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सलग 6 सामने जिंकले होते. मात्र राजस्थानने एकाच विजयासह पराभवाची मालिका खंडीत केली आणि हैदराबादला 19 व्या मोसमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा