AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RR Eliminator : अभिषेक शर्मा निर्णायक सामन्यात ढेर, जोफ्रा आर्चरकडून झिरोवर गेम

Abhishek Sharma Duck : भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा पुन्हा एकदा निर्णायक सामन्यात अपयशी ठरला आहे. अभिषेक शर्मा याला राजस्थान रॉयल्स विरुद्ध एलिमिनेटर सामन्यात 1 धावही करता आली नाही. जोफ्रा आर्चर याने अभिषेकला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

SRH vs RR Eliminator : अभिषेक शर्मा निर्णायक सामन्यात ढेर, जोफ्रा आर्चरकडून झिरोवर गेम
Abhishek Sharma DuckImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 27, 2026 | 11:05 PM
Share

सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक आणि ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने अनेक सामन्यांत टीमला एकहाती विजय मिळवून दिला आहे. मात्र हैदराबादचा फलंदाज प्लेऑफमधील सामन्यात अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. अभिषेक शर्मा याला 27 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध हे चित्र बदलून आपल्या टीमला जबरदस्त अशी सुरुवात मिळवून देण्याची संधी होती. मात्र अभिषेक अपयशी ठरला. अभिषेकने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध 244 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना घोर निराशा केली. त्यामुळे हैदराबादचं धावांआधी विकेट कॉलममधील खातं उघडलं. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख फलंदाज जोफ्रा आर्चर याने अभिषेकला याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

अभिषेक शर्मा डक

वैभव सूर्यवंशी याच्या 97 आणि ध्रुव जुरेल याने केलेल्या 50 धावांच्या जोरावर राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 243 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 12.20 च्या रनरेटने धावा करायच्या होत्या. तसेच या मोसमात आतापर्यंत एकूण 9 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. तसेच ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी स्फोटक खेळी करण्यात माहीर आहे. त्यामुळे या दोघांकडून हैदराबादला कडक सुरुवातीची आशा होती.

हेड आणि अभिषेक मैदानात आले. अभिषेकने स्ट्राईक घेतली. जोफ्राने पहिलाच बॉल डॉट टाकला. त्यानंतर जोफ्राने दुसर्‍याच बॉलवर अभिषेकला विकेटकीपर ध्रुव जुरेल याच्या हाती कॅच आऊट केलं.

अभिषेक शर्मा झिरोवर आऊट, जोफ्रा आर्चरकडून पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट

अभिषेकची 19 व्या मोसमातील कामगिरी

अभिषेकने 19 व्या मोसमात साखळी फेरीपर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. अभिषेक या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठव्या स्थानी आहे. अभिषेकने 14 डावांत 43.30 च्या सरासरीने आणि 206.22 च्या स्ट्राईक रेटने एकूण 563 धावा केल्या आहेत. अभिषेकने या दरम्यान 1 शतक आणि 4 अर्धशतक लगावले आहेत. मात्र प्लेऑफमधील कामगिरी पाहता अभिषेक अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतं. अभिषेकचा हा त्याच्या कारकीर्दीतील प्लेऑफमधील चौथा सामना होता.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान लाईव्ह स्कोअरकार्ड

अभिषेकची प्लेऑफमधील कामगिरी

दरम्यान अभिषेक आतापर्यंत प्लेऑफमध्ये एकूण 4 सामने खेळला आहे. अभिषेकने या 3 सामन्यांत एकूण 17 धावा केल्या आहेत. अभिषेकने या 4 सामन्यांत 3, 12 2 आणि 0 अशा धावा केल्या आहेत.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप