Malaika Arora : कोणता पुरुष माझ्या दारात आला तर स्वीकारेल पण… घटस्फोटानंतर मलायका अरोराचं मोठं वक्तव्य

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान याने दुसरं लग्न केलं. तर मलायकाच्या आयुष्यात देखील नव्या पुरुषाची एन्ट्री झाली... आता देखील मलायका हिने खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे...

Malaika Arora : कोणता पुरुष माझ्या दारात आला तर स्वीकारेल पण... घटस्फोटानंतर मलायका अरोराचं मोठं वक्तव्य
अभिनेत्री मलायका अरोरा
| Updated on: Dec 31, 2025 | 9:21 AM

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता मलायका हिने घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं आहे. घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल मलायकाने पहिल्यांदा मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेता अरबाज खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला. ज्यामध्ये तो एका गाण्यावर डान्स करताना दिसला, ‘तेरे लिए मैंने पहले वाली छोड़ दी…’, आता मलायका हिने देखील दुसऱ्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मलायका अरोरा म्हणाली, ‘ज्या दिवशी मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. तेव्हा माझ्यावर अनेकांनी निशाणा साधला… बाहेरचे तर सोडा… घरतल्या लोकांनी देखील माझा विरोध केला… माझ्या निर्णयावर अनेकांना प्रश्न देखील उपस्थित केले. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिली आणि घटस्फोट घेतल्यानंतर मला कोणता पश्चाताप झाला नाही आणि होत देखील नाही…’

पुढे मलायका म्हणाली, ‘जर घटस्फोट होत असेल तर, महिलांना दोषी ठरवलं जातं… महिलेचीच चूक असेल… असं सांगितलं जातं… पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आणखी काय होणार… येथे पुरुषांनी घटस्फोट घेतला तर, कोणी काहीही बोलत नाही. पण हेच जर महिलेने केलं तर, ती आदर्श महिला नसते…’

दुसऱ्या लग्नाबद्दल देखील मलायका हिने मोठं वक्तव्य केलं. ‘मला लग्नावर विश्वास आहे. पण मी लग्नाच्या मागे धावत नाही. मी वैवाहिक आयुष्याचा अनुभव घेतला आहे आणि माझे कुटुंब आहे, पण मला अजूनही प्रेम आवडते. मला प्रेम करायला आणि प्रेम वाटायला आवडते. माझ्या दारात कोणता पुरुष आला तर मी स्वीकारेल पण मी स्वतः कोणाच्या मागे धावणार नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

मलायका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षी अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अरबाज याने शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आणि एका मुलीचं जगात स्वागत केलं… तर मलायका हिचे अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत प्रेमसंबंध होते.. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही..