Malaika Arora: ..म्हणून अरबाजला घटस्फोट दिला; मलायकाने सांगितलं घटस्फोटामागचं खरं कारण

"दबंग प्रदर्शित होईपर्यंत सगळं ठीक होतं पण.."; मलायका-अरबाजमध्ये नेमकं कुठे बिनसलं?

Malaika Arora: ..म्हणून अरबाजला घटस्फोट दिला; मलायकाने सांगितलं घटस्फोटामागचं खरं कारण
अरबाज खान, मलायका अरोरा
Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 06, 2022 | 10:12 AM

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत झाली. 1998 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. 18 वर्षे संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायकाचा नवीन शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये तिने घटस्फोट घेण्यामागचं खरं कारण काय, त्याबद्दल सांगितलं. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा तिचा शो नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

काही करून घरातून बाहेर पडायचं होतं, म्हणून अरबाजशी लग्न केल्याचं तिने सांगितलं. प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि मैत्रीण फराह खानशी बोलताना मलायकाने सांगितलं की तिने अरबाजला प्रपोज केलं होतं. “मी अरबाजला प्रपोज केलं होतं. हे कोणालाच माहीत नाही. अरबाजने मला प्रपोज केलं नव्हतं. तर मी त्याला लग्नासाठी विचारलं होतं. मला लग्न करायचं आहे, तू तयार आहेस का, असा प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर तो अत्यंत शांतपणे म्हणाला, तू तारीख आणि जागा ठरव”, असं मलायका म्हणाली.

18 वर्षांच्या संसारात नेमकं काय बिनसलं?

“वेळेनुसार माझ्या स्वभावात बराच बदल झाला. मला माझ्या आयुष्यात काही वेगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. उलट आता घटस्फोटानंतर आम्ही नीट बोलू लागलो आहोत असं मला वाटतंय. दबंग हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमचं ठीकठाक चाललं होतं. पण त्यानंतर आम्ही एकमेकांविषयी चिडचिडे झालो. आमच्या नात्यातील अंतर दिवसेंदिवस वाढतच गेलं”, असं तिने फराहला सांगितलं.

घटस्फोटानंतर मलायका आता अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. तर अरबाज खान हा मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.