
सध्या अनेक बॉलिवूड स्टार्स अभिनयासोबतच इतर व्यवसायांकडेही वळालेले पाहायला मिळत आहे. यात अभिनेत्यांसोबतच अभिनेत्रीही आघाडीवर आहे. जसंकी कंगनानेही मनालीमध्ये तिचं एक सुंदर रेस्टॉरंट सुरु केलं आहे. त्याचपद्धतीने मलायका अरोराने देखील तिच्या मुलासोबत एक रेस्टॉरंट सुरु केलं आहे. अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रॉपर्टींमध्ये पैसे गुतवण्याचं काम करत आहेत.
सनी देओलच्या एका प्रॉपर्टीवर मलायकाचाही का असणार हक्क?
मात्र आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती मलायकाचीच. कारण सनी देओलच्या एका प्रॉपर्टीवर चक्क मलायकाचाही हक्क असणार आहे. होय एका रिपोर्टनुसार मलायका अरोरा सनी देओलच्या एका प्रॉपर्टीचा भाग होणार आहे. जुहूमधील सनी देओलचा ‘सनी व्हिला’ प्रसिद्ध आहे. सुपर साउंड, एक प्रिव्ह्यू थिएटर आणि दोन पोस्ट-प्रॉडक्शन सूट असलेला हा व्हिला अनेकांचं खास आकर्षण आहे.
मलायकाचं नवीन रेस्टॉरंट सुरु होणार
पण इथे मलायकाचा काय संबध तर, मलायका या व्हिलामध्ये स्वत:चा बिझनेस सुरु करणार असल्याची चर्चा आहे. मलायका अभिनयासोबतच आता एक बिझनेस वुमन म्हणूनही पुढे येत आहे.
या व्हिलाचा एक भाग बराच काळ रिकामा आहे आणि आता तिथे मलायका तिथे रेस्टॉरंट किंवा कॅफे सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मलायकाने गेल्या वर्षी तिच्या मुलासोबत ‘स्कारलेट हाऊस’ नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. आता ती पुन्हा एकदा या नवीन रेस्टॉरंटबद्दल चर्चेत आली आहे.
एका रिपोर्टनुसार या कॅफेचं काम वेगाने सुरू आहे आणि असे म्हटलं जातंय की हे कॅफे पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक जण असेही म्हणत आहेत की ही स्कारलेट हाऊसचीच एक शाखा असणार आहे. तर काही म्हणत आहेत की ही एक नवीन आउटलेट असणार आहे. तथापि, याबद्दलची कोणतीही नक्की अशी माहिती समोर आलेली नाही.
कॅफे किंवा रेस्टॉरंट व्हिलाच्या तळमजल्यावर असणार
मिळालेल्या माहितीनुसार मलायकाचा कॅफे किंवा रेस्टॉरंट व्हिलाच्या तळमजल्यावर असणार आहे, जिथे एकेकाळी कॅन्टीन होतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी सनी व्हिला चर्चेचा विषय बनला जेव्हा त्याच्या लिलावाची नोटीस आली होती. ही सूचना 2o ऑगस्ट रोजी एका वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. मात्र एका दिवसातच ही नोटीस मागे घेण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे.
90 वर्षे जुन्या बंगल्यात रेस्टॉरंट
मलायकाच्या पहिल्या रेस्टॉरंट हे 3 डिसेंबर 2024 रोजी उघडण्यात आलं आहे. हे रेस्टॉरंट मलायका आणि तिचा मुलगा अरहान खानने मिळून सुरु केलं आहे. हे रेस्टॉरंट पाली हिलमधील एका सुंदर 90 वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात सुरु करण्यात आलं आहे.
चर्चा फक्त ‘स्कारलेट हाऊस’च्या इंटेरिअरचीच नाही तर मेन्यूची सुद्धा आहे. कारण तेथील सर्व मेन्यू हे हेल्थी आणि काळजीपूर्वक डिझाइन केले आहेत. या ‘स्कारलेट हाऊस’नंतर सनी व्हिलामधील तिचा कॅफे कसा असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.