Belraj Kalarickal : प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन, हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला, महिन्याभरापूर्वी बांधलेली लग्नगाठ
Belraj Kalarickal : प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं वयाच्या 28व्या वर्षी निधन झालं आहे.

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी वयाच्या २८ व्या वर्षी निधन झालं. तो कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. बेलराजच्या अचानक झालेल्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्याचे मित्र आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. बेलराजचा पहिला दिग्दर्शित चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. बेलराज कलारिकलच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल.
२८ वर्षीय दिग्दर्शक, बेलराज कलारिकल, हा कोट्टायमच्या मणिमाला येथील रहिवासी होता. पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. बेलराज दिग्दर्शित ‘कॉफी स्क्वॉड’ ही सीरिज १५ ऑक्टोबर रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजचे चार भाग प्रदर्शित झाले असून, एकूण ३६ भागांचं चित्रीकरण आधीच पूर्ण झालं होतं. बलराज, दिग्दर्शक श्रीकांत यांच्यासोबत राहत होता. त्यांनी सांगितलं की, अनेक वेळा बेल वाजवूनही जेव्हा बलराजनं दार उघडलं नाही, तेव्हा त्याचं निधन झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
View this post on Instagram
या दुःखद बातमीनंतर, जिओ हॉटस्टारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत बेलराजला श्रद्धांजली वाहिली. बेलराज हा फर्स्ट प्रिंट स्टुडिओच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. या प्रॉडक्शन हाऊसनं पुरस्कार-विजेता चित्रपट ‘ओट्टामुरी वेलिचम’ आणि वेब सिरीज ‘केरळा क्राईम फाईल्स’ यांसारख्या अनेक उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. दिग्दर्शक होण्यापूर्वी, त्यानं ‘निझाल’, ‘मधुरम’ आणि ‘डाकिनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम केलं होतं. त्यानं ‘डाकिनी’, ‘कीडम’ आणि ‘खो खो’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये राहुल रिजी नायर यांनाही सहाय्य केलं होतं.
बेलराज कलारिकलनं नुकतीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एका नवीन अध्यायाला सुरुवात केली होती. सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर, त्यानं ११ सप्टेंबर २०२६ रोजी अथीरा बिंदू साबूसोबत लग्न केलेलं. आता, त्यांच्या लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच बेलराज कलारिकलचं निधन झाले असून, त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे.
